Nikesh Arora highest paid indian CEO : … केवळ सतराशे रुपये घेऊन अमेरिकेला जातो. तेथे शिक्षण घेतो. जगासाठी एक ड्रीम असलेल्या अमेरिकेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यांचेही तेच स्वप्न होते. नोकरी मिळविण्यासाठी धडपडतो. पण प्रत्येक ठिकाणी त्यांना नकार मिळतो. दहा वेळा, पंधरा वेळा नाहीतर तब्बल चारशे कंपन्यांनी त्यांना नकार दिला. पण त्यांनी हार मानली नाही. आता तिच व्यक्ती मार्क झुकरबर्ग ( Mark Zuckerberg), सुंदर पिचाईंपेक्षा (Sundar Pichai) कितेकपटीने जास्त पॅकेज घेतेय. ती व्यक्ती जगातील सर्वाधिक पॅकेज घेणारी सीईओ ठरलीय. त्यांचे नाव आहे निकेश अरोडा.(Nikesh Arora) ते कोणत्या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांचे पॅकेज किती आहे हे जाणून घेऊया….
निकेश अरोडाचे शिक्षण कुठे झाले ?
निकेश अरोडा हे मूळचे उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचे. त्यांचे वडिल भारतीय वायूसेनेत नोकरीला होते. त्यामुळे त्यांची नेहमीच वेगवेगळ्या शहरांमध्ये बदली होत. त्यामुळे लहानपणापासून ते वेगवेगळ्या शहरात राहिले. त्यांचे शिक्षण एअर फोर्सच्या शाळेमध्ये झाले. वाराणसीतील Indian Institute of Technology येथून ते इंजिनिअर झाले. इंजिनिअर झाल्यानंतर त्याला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. 1990 मध्ये निकेश यांच्याकडे केवळ शंभर डॉलर म्हणजे तेव्हाचे 1700 रुपये होते. बोस्टन येथील नॉर्थईस्टर्न विश्वविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण झाले. तेव्हा त्यांना स्कॉलरशीपही मिळाली होती. तेव्हा त्यांना कॅम्प्य्टूर सायन्स शिकविण्यास मिळाले. त्यासाठी त्याने कॉम्प्ट्युर सायन्सचे काही कोर्स ही केले.(Nikesh Arora highest paid indian CEO)
नोकरीसाठी प्रत्येक ठिकाणी नकार पण…
शिक्षण झाल्यानंतर ते नोकरी शोधत होते. तेव्हा भारतीय टॅलेंटला अमेरिकेत एेवढे महत्त्व नव्हते. त्याचा फटका निकेश यांना बसला. अनेक कंपन्यांमध्ये इंट्री लेव्हल नोकरीसाठी त्यांनी अर्ज केले. परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांना रिजेक्ट केले जात. थोडाथिडक्या नव्हे तर तब्बल चारशे कंपन्यांनी त्यांना नोकरी दिली नाही. पण ते खचले नाहीत. ते नोकरीच्या शोधत होते. अखेर त्यांचा शोध संपला. 1992 मध्ये फिडेलिटी इनवेस्टमेंटमध्ये ते ट्रेनी म्हणून रूजू झाले. त्यांचे कष्ट आणि टॅलेंटपाहून त्यांना लवकरच फिडेलिटी टेक्नोलॉजीचे व्हाइस प्रेसिडेंट बनविण्यात आले. नोकरीबरोबर त्यांनी वेगवेगळे कोर्सही पूर्ण केले. त्यात एमएस आणि सीएफए ही डिग्री त्यांनी पूर्ण केली
गुगलमध्ये दहा वर्षे नोकरी
वेगवेगळ्या डिग्रा आणि नोकरीच्या अनुभवामुळे त्यांना 2004 मध्ये गुगलमध्ये नोकरीची ऑफर आली. गुगलमध्ये दहा वर्षे नोकरी केल्यानंतर 2014 त्याने राजीनामा दिला आणि स्वॉफ्ट बँक ज्वाइन केली. तेथे ते सीओओ होते.
अरोडामुळे कंपनीची 100 अब्ज डॉलरपर्यंत भरभराट
2018 मध्ये अरोडा हे पालो ऑल्टो नेटवर्क्सचे (Palo_Alto_Networks) सीईओ म्हणून ज्वाइन झाले. ही अमेरिकेतील बहुराष्ट्रीय सायबर सुरक्षा कंपनी आहे. अरोडा यांच्या कार्यकाळात कंपनीची भरभराट झाली. तब्बल 150 देशांमधील 70 हजार कंपन्यांना ही कंपनी सायबर सुरक्षा पुरविते. 2018 मध्ये या कंपनीचे व्हॅल्युशन 18 अब्ज डॉलर होते. तर अराडा यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचे व्हॅल्युशन 100 अब्ज डॉलर इतके झाले आहे.
निकेश अरोडांना 1300 कोटींचे पॅकेज
वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार निकेश अरोडा यांना 2023 मध्ये 15.14 करोड डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 1 हजार 300 कोटी रुपये वार्षिक पगार होता. ते जगातील सर्वाधिक पॅकेज घेणारे सीईओ ठरलेत. त्यांचा पगार मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यापेक्षा अनेक पटीने जास्त आहे. मार्क झुकरबर्गला 2.44 कोटी डॉलर, तर सुंदर पिचाई यांना 88 लाख डॉलरचे पॅकेज आहे. यातून हुशारी आणि कष्टातून भारतीय व्यक्तीने देशाचे नावही जगात उंचावलंय.