Donald Trump : गेल्या महिन्याभरापासून अमेरिका आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेत देखील या युद्धामुळे अर्थव्यवस्था दबावाखाली आल्याने आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकासह युरोपमध्ये आंदोलन होताना दिसत आहे. अमेरिकेत ट्रम्प यांनी उचललेल्या पावलांचा निषेध करण्यासाठी शनिवारी “नो किंग्स” (No Kings) रॅलींमध्ये लाखो लोक जमले होते.
मिनेसोटा राज्यातील सेंट पॉल शहरात मिनेसोटा स्टेट कॅपिटलच्या परिसरात हजारो लोकांनी एकत्र येत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत युद्ध संपवण्याची मागणी केली आहे.
अमेरिकेतील आयोजकांच्या अंदाजानुसार, “नो किंग्स” रॅलींच्या पहिल्या दोन ‘ टप्प्यात जूनमध्ये 50 लाखांहून अधिक आणि ऑक्टोबरमध्ये 70 लाख सहभागींनी हजेरी लावली होती. या आठवड्यात, त्यांनी पत्रकारांना सांगितले की, यावेळी 90 लाख लोक सहभागी होतील अशी त्यांना अपेक्षा आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या सर्व 50 राज्यांमध्ये 3,100 हून अधिक कार्यक्रमांची नोंदणी करण्यात आली होती.
तर दुसरीकडे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अबीगैल जॅक्सन यांनी या चळवळीला डाव्या विचारसरणीच्या (left-wing) निधी पुरवठा करणाऱ्या जाळ्याचा परिणाम असल्याचे सांगून फेटाळून लावले. एका निवेदनात जॅक्सन म्हणाले की, “या विषयाची दखल घेणारे पत्रकार तेच आहेत, ज्यांना यावर वार्तांकन करण्यासाठी पैसे दिले जातात.”
नॅशनल रिपब्लिकन काँग्रेस कमिटीने (NRCC) देखील यावर तीव्र टीका केली. NRCC च्या प्रवक्त्या मॉरीन ओ’टूल यांनी म्हटले, “या अमेरिका-विरोधी रॅली म्हणजे असेच एक व्यासपीठ आहे, जिथे अति-डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या अत्यंत हिंसक आणि विकृत कल्पनांना वाचा फोडली जाते.”
रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष, पद्मभूषण डॉ. विजयपत सिंघानिया यांचं निधन-
युरोपपासून ऑस्ट्रेलियापर्यंत रॅलींचे नियोजन
या कार्यक्रमांचे नेतृत्व करणाऱ्या गटाचे सह-कार्यकारी संचालक एझरा लेविन यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, युरोपपासून लॅटिन अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापर्यंतच्या डझनभरहून अधिक देशांमध्येही रॅलींचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांनी नमूद केले की, ज्या देशांमध्ये घटनात्मक राजेशाही अस्तित्वात आहे, तिथे या आंदोलनांना “नो टायरंट्स” (No Tyrants – जुलमी राजवट नको) असे नाव देण्यात आले आहे. रोममध्ये, आंदोलकांनी इराणवरील इस्रायली आणि अमेरिकन हल्ल्यांना विरोध करणारे फलक फडकवले आणि युद्धमुक्त जगाची मागणी केली.
