Download App

Nobel Prize 2024 : व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना वैद्यकशास्त्राच्या नोबेल जाहीर…

यंदाच्या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना हा पुरस्कार जाहीर झाला

  • Written By: Last Updated:

Nobel Prize 2024 : यंदाच्या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारांच आज घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे व्हिक्टर ॲम्ब्रोस (Victor Ambros) आणि गॅरी रुवकुन यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मायक्रो आरएनएच्या शोधासाठी दोघांनाही शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा शोध शरीरातील अवयवांच्या विकासासाठी आणि कार्यासाठी महत्त्वाचा असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.

डायनामाइटचा शोध लावणारे शास्त्रज्ञ नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार दिले जातात. नोबेल पारितोषिकाची सुरुवात 1901 मध्ये झाली आणि 2024 पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील 229 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 229 विजेत्यांपैकी केवळ 13 महिला महिलांना आजवर हा पुरस्कार मिळाला आहे. या वर्षीचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 10 डिसेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना विविध पेशींचे प्रकार कसे विकसित होतात यात रस होता. त्यांनी मायक्रोआरएनए शोधून काढला, या शोधाच जीन नियमनात महत्त्वाची भूमिका राहू शकते. हा शोध शरीरातील अवयवांच्या विकासासाठी आणि कार्यासाठी महत्त्वाचा असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.

दरम्यान, यावर्षी 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत विज्ञान, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता यांसारख्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना नोबेल पारितोषिक जाहीर केले जाणार आहेत. भौतिकशास्त्रातील 2024 चे नोबेल पारितोषिक मंगळवारी घोषित केले जाईल, त्यानंतर बुधवारी रसायनशास्त्राचे पारितोषिक जाहीर केले जाईल.

हे पुरस्कार स्टॉकहोम, स्वीडन येथे प्रदान केले जाणार आहेत. दरवर्षी 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच सुमारे 8.90 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येतात.

गेल्या वर्षी नोबेल कोणाला मिळाले?

गेल्या वर्षी वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना देण्यात आले होते.

 

 

 

follow us

संबंधित बातम्या