Nobel Award 2023 : साहित्यातील नोबेल पुरस्कार लेखक जॉन फॉसे यांना जाहीर

Literature Nobel Award 2023 : वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारांनंतर आज (दि. 5) साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार नॉर्वेजियन लेखक जॉन फॉसे (Jon Fosse) यांना जाहीर करण्यात आला आहे. नाटकांसाठी आणि गद्यासाठी त्यांना यावर्षीचा साहित्यातील नोबेल जाहीर करण्यात आला आहे. (Literature Nobel 2023 Awarded To Norwegian Author Jon […]

Letsupp Image   2023 10 05T164354.291

Letsupp Image 2023 10 05T164354.291

Literature Nobel Award 2023 : वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारांनंतर आज (दि. 5) साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार नॉर्वेजियन लेखक जॉन फॉसे (Jon Fosse) यांना जाहीर करण्यात आला आहे. नाटकांसाठी आणि गद्यासाठी त्यांना यावर्षीचा साहित्यातील नोबेल जाहीर करण्यात आला आहे. (Literature Nobel 2023 Awarded To Norwegian Author Jon Fosse)

साहित्यातील 2022 चा नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका एनी अर्नो यांना देण्यात आला होता. एर्नी फ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या प्राध्यापक असून, त्यांचे साहित्य हे आत्मचरित्रात्मक आणि समाजशास्त्रावर आधारित आहे.

जॉन फॉसे कोण?

29 सप्टेंबर 1959 रोजी जन्मलेल्या फॉसे यांची नॉर्वेच्या प्रसिद्ध नाटककारांमध्ये गणना केली जाते. त्यांनी सुमारे 40 नाटकांसह अनेक कादंबऱ्या, लघुकथा, लहान मुलांची पुस्तके, कविता आणि निबंधही लिहिले आहेत. ते नॉर्वेजियन भाषेची प्रमाणित लिखित भाषा नायनोर्स्क लिपीमध्ये लिहितात. जगभरातील 40 हून अधिक भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे. त्यांची पहिली कादंबरी ‘Raudt, Swart’ 1983 साली प्रकाशित झाली आहे.

World Cup 2023 : बीसीसीआयची मोठी घोषणा! वर्ल्डकप सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मिळणार ‘ही’ सुविधा

यंदाचे नोबेल कुणा-कुणाला मिळाले? 

रसायनशास्त्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार मौंगी जी, बावेंडी, लुईस ई, ब्रुस आणि एलॅक्सी आई यांना घोषित करण्यात आला आहे. क्वांटम डॉट्सच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर, कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला असून या शोधामुळे कोरोना व्हायरस म्हणजेच COVID-19 विरुद्ध प्रभावी mRNA लस विकसित करण्यात मदत झाली.

तर, भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार यंदाच्या वर्षी संयुक्तपणे पियरे ऑगस्टिनी, फेरेंक क्रॉझ आणि अॅन ल’हुलियर यांना जाहीर करण्यात करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉन्सवरील अभ्यासासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.

Exit mobile version