अमेरिका आणि दक्षिण कोरियाला थेट आव्हान, उत्तर कोरियाने पुन्हा डागली क्षेपणास्त्रे

Missiles North Korea : उत्तर कोरिया (North Korea) आणि दक्षणि कोरिया यांच्यात कायमच तणाव दिसतो. एकमेकांचे शेजारी असणाऱ्या या दोनही देशांमध्ये भारत आणि पाकिस्तान सारखीच कटुता आहे. या दोन्ही देशामध्ये कायम कुरबुरी सुरू असतात. आताही उत्तर कोरियाने शनिवारी समुद्रात अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे (Missiles) डागली आणि यूएस आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याच्या संयुक्त लष्करी सरावांना प्रत्युत्तर दिलं, […]

Untitled Design (28)

Missiles North Korea

Missiles North Korea : उत्तर कोरिया (North Korea) आणि दक्षणि कोरिया यांच्यात कायमच तणाव दिसतो. एकमेकांचे शेजारी असणाऱ्या या दोनही देशांमध्ये भारत आणि पाकिस्तान सारखीच कटुता आहे. या दोन्ही देशामध्ये कायम कुरबुरी सुरू असतात. आताही उत्तर कोरियाने शनिवारी समुद्रात अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे (Missiles) डागली आणि यूएस आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याच्या संयुक्त लष्करी सरावांना प्रत्युत्तर दिलं, असा दावा दक्षिण कोरियाच्या लष्कराने केला आहे.

उत्तर कोरियाने कधी क्षेपणास्त्रे डागली?
दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने एका निवेदनात म्हटले आहे की, दक्षिण कोरिया आणि यूएस गुप्तचर अधिकारी प्रक्षेपणाच्या तपशीलांचे विश्लेषण करत आहेत. अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा 11 दिवसांचा संयुक्त लष्करी सराव संपल्यानंतर दोन दिवसांनी उत्तर कोरियाने हे क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याचं साऊथ कोरियाने सांगितलं.

नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील सापडले बेवारस अवस्थेत, रुग्णालयात उपचार सुरू 

याआधी देखील म्हणजे गुरुवारी उत्तर कोरियाने अमेरिका-दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त लष्करी सराव दरम्यान दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागून आण्विक हल्ल्याचा सराव केला होता. उत्तर कोरियाच्या मीडिया KCNA ने वृत्त दिले होते की प्योंगयांगने संपूर्ण दक्षिण कोरियाला लक्ष्य केल असून सातत्याने हल्लांचा पूर्वाअभ्यास केला जातो.

उत्तर कोरियाने विक्रमी संख्येने शस्त्रास्त्रांची चाचणी केली
संघर्ष झाल्यास दक्षिण कोरियाचा भूभाग ताब्यात घेण्यासाठी कमांड पोस्ट सराव करत असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे. उल्लेखनीय आहे की उत्तर कोरियाने यावर्षी विक्रमी शस्त्रास्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत. गेल्या आठवड्यातच उत्तर कोरियाने गुप्तचर उपग्रह कक्षेत ठेवण्याचा दुसरा प्रयत्न केला होता, जो अयशस्वी झाला.

आणखी एक उल्लेखनीय बाब ही की, उत्तर कोरियाने गेल्या महिन्यात अंतराळ रॉकेट प्रक्षेपित केल्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण कोरियाने शुक्रवारी उत्तर कोरियाच्या पाच व्यक्ती आणि एका कंपनीवर निर्बंध लादले होते.

Exit mobile version