बिल गेट्स यांचा रेकॉर्ड मोडणार?; Nvidia च्या CEO चा घटस्फोट ठरवणार जगातील सर्वात मोठा रेकॉर्ड!

Nvidia CEO Divorce Nvidia चे CEO जेन्सन हुआंग यांच्या संभाव्य घटस्फोटाची जगभर चर्चा. पत्नी लोरी हुआंग यांना 60 अब्ज डॉलर मिळणार?

Nvidia CEO Divorce

Nvidia CEO Divorce

Nvidia CEO Divorce : ज्या माणसाच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण जगाची टेक इंडस्ट्री नाचते, ज्याच्या कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (AI) दुनिया बदलून टाकली… आज तोच माणूस एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे आणि ती चर्चा आहे त्यांच्या संभाव्य घटस्फोटाची! जगातील आघाडीची चिप उत्पादक कंपनी Nvidia चे सीईओ जेन्सन हुआंग हे त्यांच्या व्यवसायामुळे नव्हे, तर वैवाहिक आयुष्याबाबतच्या चर्चांमुळे ते चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेन्सन हुआंग यांनी एका चायनीज महिलेसोबत अफेयरबाबत केलेल्या विधानानंतर हा विषय वाऱ्यासारखा पसरला आहे.

आता प्रश्न हा आहे की, जर लोरी हुआंग यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला, तर जगातील हा सर्वात महार्घ घटस्फोट ठरणार आहे? ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या रिपोर्टनुसार, जर कायदेशीर प्रक्रिया पार पडली, तर लोरी हुआंग यांना तब्बल 60 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 5.3 लाख कोटी रुपये किंवा त्याहून अधिकची संपत्ती मिळू शकते. काही वर्षांपूर्वी बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटावेळी 76 अब्ज डॉलर्सच्या चर्चेने खळबळ उडाली होती, तर जेफ बेजोस आणि मॅकेंझी स्कॉट यांच्या घटस्फोटात 38 अब्ज डॉलर्स मिळाले होते. त्यामुळे जर जेन्सन आणि लोरी वेगळे झाले, तर हा आकडा या सगळ्यांना मागे टाकू शकतो अशी चर्चा आता रंगली आहे.

जेन्सन हुआंग यांची संपत्ती किती?

कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार, लग्नानंतर कमावलेली संपत्ती ही दोघांची संयुक्त संपत्ती मानली जाते. फोर्ब्सच्या 9 नोव्हेंबर 2026 च्या आकडेवारीनुसार जेन्सन यांची आज एकूण संपत्ती 155 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. त्यांच्याकडे एनवीडियाचे कोटींच्या घरात शेअर्स आहेत. जर या संपत्तीचे कायदेशीर विभाजन झाले, तर लोरी यांच्या पारड्यात मोठा हिस्सा येऊ शकतो.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, जेन्सन हुआंग यांच्या नियंत्रणातील मालकी आणि दाम्पत्याच्या लिव्हिंग ट्रस्टसह सहा कंपन्यांकडे Nvidia चे जवळपास 67 कोटी शेअर्स आहेत. आता समजा, या शेअर्सपैकी निम्मे शेअर्स लोरी हुआंग यांना मिळाले, तर त्यांच्या वाट्याला तब्बल 33.5 कोटी शेअर्स येतील. प्रति शेअर 179 डॉलर हा दर गृहीत धरलं, तर या शेअर्सची किंमत होते जवळपास 60 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात तब्बल 5 लाख 30 हजार कोटी रुपये.  मात्र, हा केवळ संभाव्य संपत्ती वाटपाचा अंदाज आहे. प्रत्यक्षात किती संपत्ती मिळेल, हे कायदेशीर कागदपत्रे, ट्रस्टमधील अटी आणि मालमत्तेच्या स्वरूपावर अवलंबून असेल.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

कॅलिफोर्नियाचा कायदा काय सांगतो?

एनवीडियाचे (Nvidia) सीईओ जेन्सन हुआंग आणि त्यांच्या पत्नी लोरी हुआंग. 1980 च्या दशकात लग्न झालेलं हे जोडपं. विशेष म्हणजे, जेन्सन यांनी एनवीडिया कंपनीची स्थापना करण्याच्या अगदी आधी हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार, लग्नानंतर मिळवलेली संपत्ती सामान्यतः पती-पत्नीची संयुक्त मालमत्ता मानली जाते. घटस्फोटाच्या वेळी अशा मालमत्तेचे समान वाटप होऊ शकते. त्यामुळे Nvidia मधील लग्नानंतर निर्माण झालेल्या संपत्तीतील लोरी यांचा संभाव्य हिस्सा महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, लग्नापूर्वीची मालमत्ता, वारसा, वैयक्तिक भेटवस्तू आणि ट्रस्टमधील अटी यांचा स्वतंत्र विचार केला जातो. तसेच, पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे कॅलिफोर्नियात घटस्फोटाच्या वेळी मालमत्तेतील हिस्सा आपोआप वाढत नाही.

बिल गेट्स आणि जेफ बेजोस यांचाही विक्रम मागे पडणार?

आता या संभाव्य घटस्फोटाची तुलना जगातील दोन मोठ्या घटस्फोटांशी केली जात आहे. 2021 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाशी संबंधित संपत्ती वाटपाचा 76 अब्ज डॉलरचा आकडा चर्चेत राहिला. मात्र, प्रत्यक्ष करारातील संपूर्ण आर्थिक तपशील सार्वजनिक झालेला नाही. दुसरीकडे, 2019 मध्ये Amazon चे संस्थापक जेफ बेजोस आणि मॅकेन्झी स्कॉट यांचा घटस्फोट झाला होता. त्यावेळी मॅकेन्झी स्कॉट यांना Amazon चे 1.97 कोटी शेअर्स मिळाले होते. त्या वेळच्या बाजारभावानुसार त्यांची किंमत सुमारे 38.3 अब्ज डॉलर होती. त्यामुळे लोरी हुआंग यांना संभाव्य 60 अब्ज डॉलर मिळाल्यास हा आकडा जेफ बेजोस यांच्या घटस्फोटातील संपत्ती वाटपापेक्षा मोठा ठरेल. मात्र, बिल गेट्स यांच्या 76 अब्ज डॉलरच्या चर्चित आकड्याला मागे टाकेलच असे नाही.

घटस्फोट होणार की केवळ चर्चा

मात्र, इथे एक ट्विस्ट आहे! जेन्सन हुआंग आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोटाची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे 60 अब्ज डॉलरचा आकडा सध्या केवळ एक अंदाज आहे. प्रत्यक्ष घटस्फोट झाला, तरच या संपत्तीच्या वाटपाबाबतचे चित्र स्पष्ट होईल. महत्त्वाचे म्हणजे, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीपेक्षा त्यांच्या वैवाहिक आयुष्याची चर्चा सध्या अधिक रंगताना दिसत आहे. मात्र, 5.3 लाख कोटी रुपयांच्या संभाव्य घटस्फोटाच्या दाव्याला सध्या अंतिम सत्य मानणे घाईचे ठरेल.

Exit mobile version