Download App

इस्त्रायल-हमास यांच्यातील संघर्ष तीव्र, आतापर्यंत १ हजार नागरिकांचा मृत्यू, रॉकटे हल्ले सुरूच

Israel vs Hamas Rocket attack : कालपासून इस्त्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. गाझा पट्टीतील सत्ताधारी हमास या दहशतवादी गटानं शनिवारी पहाटे इस्रायलवर अचानकपणे रॉकेट हल्ला (Rocket attack) केला. हमासने इस्रायलवर 5 हजार रॉकेट डागले. इस्रायलनेही प्रत्युत्तर म्हणून गाझा पट्टीवर रॉकेट हल्ले केले. इस्त्रायल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेलल्या संघर्षान तीव्र स्वरूप धारण केलं आहे. आतापर्यंत या हल्ल्यात 1000 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. (ongoing conflict between Israel and Hamas terrorists has intensified)

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यात 600 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, इस्त्रायलने ऑपरेशन आयर्न स्वार्ड्स अंतर्गत केलेल्या हवाई आणि लष्करी हल्लात 370 हमास नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही इस्रायलकडून गाझा पट्टीत बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. हल्ल्यादरम्यान शेजारच्या काही इमारती उद्ध्वस्त झाल्या.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात 2 दिवसांत 1000 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. हमासकडून १०० नागरिक आणि सैनिकांचं अपहरण करण्यात आल्याचं इस्त्रायलकडून सांगण्यात आलं. मीडियाच्या अहवालानुसार, इस्रायलनेही हमासच्या दहशतवाद्यांविरोधात प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलने हमासच्या विरोधात रणगाडे मैदानात उतरवले आहेत, असं सांगण्यात येतं. हे रणगाडे दक्षिण भागात तैनात करण्यात आले.

नेपाळचे परराष्ट्र मंत्री एन. पी. सौदान यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण इस्रायलमध्ये शिकणारे 12 नेपाळी विद्यार्थी हमास या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यानंतर बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे.

इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले, गाझामधील 426 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. यामध्ये हमासने रॉकेट टाकण्यासाठी वापरलेल्या 10 टॉवर्सचाही समावेश आहे

Tags

follow us