तिसऱ्या महायुद्धाचा धोका टळणार? इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण आमनेसामने; अवघं जग ‘होल्ड’वर

US-Iran peace talks अतिउच्च स्तरीय बैठकीसाठी पाकिस्तानने देशात दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला असून शाळांना सुट्टी दिली आहे.

तिसऱ्या महायुद्धाचा धोका टळणार? इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण आमनेसामने; अवघं जग 'होल्ड'वर

तिसऱ्या महायुद्धाचा धोका टळणार? इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण आमनेसामने; अवघं जग 'होल्ड'वर

Pak turns fortress, Islamabad on high alert ahead of US-Iran peace talks : जागतिक इतिहासात 11 एप्रिल हा दिवस निर्णायक ठरणार आहे. संपूर्ण जगाचा श्वास रोखून धरणारी आणि जागतिक राजकारणाची दिशा बदलणारी एक ऐतिहासिक बैठक उद्या, शनिवारी पाकिस्तानच्या राजधानीत पार पडणार आहे. जग एका बाजूला आणि दुसरीकडे दोन कट्टर शत्रू अमेरिका आणि इराण. या महाचर्चेसाठी इस्लामाबादला केवळ अभेद्य किल्लाच बनवण्यात आलेले नाही, तर त्याला एका सुरक्षित ‘बंकर’चे स्वरूप आले आहे. आकाशात फायटर जेट्सचा पहारा, जमिनीवर कमांडोजचे कडे आणि ‘रेड झोन’मध्ये असलेली शांतता बरंच काही सांगून जात आहे. ही केवळ एक बैठक नाही, तर जगाला विनाशाच्या उंबरठ्यावरून मागे खेचण्याची ही शेवटची आशा मानली जात आहे.

हजारोंचा मृत्यू अन् 55 लाख कोटींचा धूर; इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा धडकी भरवणारा हिशोब

अभेद्य सुरक्षा व्यवस्था अन् ‘ब्लू बुक’ प्रोटोकॉल लागू

इस्लामाबादला सध्या एखाद्या युद्धभूमीसारखे स्वरूप प्राप्त झाले आहे, मात्र हे स्वरूप संरक्षणात्मक आहे. राष्ट्राध्यक्ष भवन, पंतप्रधान कार्यालय आणि राजकीय दूतावास असलेल्या ‘रेड झोन’ला सील करण्यात आले आहे. येथे केवळ विशेष पास असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वेन्स आणि इराणचे नेते यांच्यासाठी ‘ब्लू बुक’ (अतिउच्च सुरक्षा नियमावली) नुसार सुरक्षा पुरवण्यात येत आहे. यामध्ये निमलष्करी दले, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांचे हजारो जवान तैनात आहेत.

दोन दिवसांचा ‘लॉकडाऊन’

अतिउच्च स्तरावरील या बैठकीसाठी पाकिस्तानने देशात दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यासाठी शहरात सार्वजनिक सुट्टी देऊन प्रशासनाने रस्ते मोकळे ठेवले आहेत, जेणेकरून प्रतिनिधींच्या ताफ्याला कोणतीही अडचण येऊ नये. या चर्चेतील सर्वात थरारक भाग म्हणजे इराणच्या शिष्टमंडळाची सुरक्षा आहे. इराणच्या विमानावर इस्रायलकडून हल्ला होण्याची शक्यता गृहीत धरून पाकिस्तानने हवाई दलाला हाय अलर्टवर ठेवले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचे विमान जेव्हा इराणच्या सीमेतून बाहेर पडले, तेव्हापासून पाकिस्तानी फायटर जेट्सनी त्याला वेढा घालून (Escort) इस्लामाबादपर्यंत आणले. एवढेच नव्हे तर, पाकिस्तानने AWACS (Airborne Warning and Control System) विमान हवेत तैनात केले आहे, जे शेकडो किलोमीटर अंतरावरील कोणत्याही संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेऊ शकते.

US-Israel-Iran : दोन आठवड्यांचा ‘युद्ध’विराम, पण दोन्ही देशांत नेमकं काय ठरलंय?

चर्चेतील मुख्य पेच: लेबनॉन आणि होर्मुझची सामुद्रधुनी

एकीकडे उद्या महाचर्चा होणार आहे मात्र, ही चर्चा सुरू होण्यापूर्वीच काही मोठे अडथळे समोर आले आहेत. ज्यामध्ये इराणने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत इस्रायल लेबनॉनवरील हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत चर्चेत सकारात्मक प्रगती होणे कठीण आहे. तसेच इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद करण्याची धमकी दिली आहे. जर ही चर्चा फिस्कटली, तर जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होऊन इंधनाचे दर गगनाला भिडू शकतात.

पाकिस्तानची ‘मुत्सद्दी’ खेळी

पाकिस्तानसाठी ही चर्चा म्हणजे आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्याची मोठी संधी आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी प्रतिनिधींसाठी ‘व्हिसा-ऑन-अरायव्हल’ देऊन मोठी मुत्सदी खेळी केली आहे. त्यामुळे जर पाकिस्तान या दोन शक्तींमध्ये ‘सीझफायर’ घडवून आणण्यात यशस्वी झाला, तर दक्षिण आशियातील भू-राजकीय राजकारणात पाकिस्तानचे महत्त्व कित्येक पटीने वाढणार आहे.

60 सेकंदांत पाकड्यांची अब्रू गेली; ‘ड्राफ्ट’ शब्द हटवला, पण शरीफ दणक्यात ‘एक्स्पोज’ झाले

जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम

जागतिक बाजारपेठेला या चर्चेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. जर चर्चेतून शांततेचे संकेत मिळाले, तर सोमवारी जागतिक शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळू शकते. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तिमाही निकाल (Q4 Results) या युद्धाच्या छायेखाली आहेत. सीझफायर झाल्यास जागतिक मंदीचे सावट दूर होण्यास मदत होईल.

Exit mobile version