Pakistan Air Strikes On Afghanistan : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला केला असून या हल्ल्यात काही दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हवाई हल्ल्यात पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेवर तहरीक-ए-तालिबानच्या 7 अड्ड्यांवर हल्ला केले आहे. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यात 19 जण ठार झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्याबाबत पाकिस्तानकडून माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्रत्युत्तर देणार असा इशारा अफगाणिस्तानकडून देण्यात आला आहे.
पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी रविवारी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. पाकिस्तानी सैन्याने गुप्तचर माहितीच्या आधारे तहरीक-ए-तालिबान (TTP) आणि त्याच्या सहयोगी संघटनांच्या 7 ठिकाणांवर टार्गेट केले असल्याची माहिती अताउल्लाह तरार यांनी दिली.
हे दहशतवादी अड्डे अफगाणिस्तान सीमेवर स्थापित केले गेले होते, जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि पाकिस्तानमध्ये हल्ले करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो असं देखील अताउल्लाह तरार यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांसाठी टीटीपी जबाबदार
पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांनी असाही दावा केला की, अफगाणिस्तान सीमेजवळील लक्ष्यित हल्ले तेच ठिकाण होते जिथे पाकिस्तानमध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करण्यात आले होते आणि जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सर्व हल्ल्यांना आणि स्फोटांना टीटीपी जबाबदार आहे. म्हणूनच, लष्कराने टीटीपीवर हल्ला केला आणि इस्लामिक स्टेट (आयएस) चे दहशतवादी देखील या दहशतवादी तळांमध्ये आश्रय घेत आहेत.
आज ‘या’ राशींना होणार फायदा; जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी कसा राहणार दिवस ?
दोन आत्मघाती हल्ल्यांना प्रत्युत्तर
तर दुसरीकडे शनिवारी पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानातील पक्तिका प्रांतातील बर्मल जिल्ह्यातील एका मदरशावर बॉम्बहल्ला केला होता. नांगरहार प्रांतातील खोग्यानी जिल्ह्यातही हवाई हल्ले करण्यात आले. बारमल आणि अर्घुन व्यतिरिक्त, नांगरहारमधील खोग्यानी, बहसोड आणि घनी खेल जिल्ह्यातही ड्रोन हल्ले करण्यात आले. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात 12 जणांचा मृत्यू झालेल्या आत्मघातकी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले.
