Download App

Pakistan Election : नवाज शरीफांना धक्का! ‘या’ तीन मतदारसंघातील निवडणूकच रद्द

Pakistan Election Result : पाकिस्तानात निवडणुका होऊन मतमोजणीही झाली (Pakistan Election Result) आहे. तरीदेखील सरकार स्थापन झालेले नाही. याचं कारण म्हणजे मतमोजणीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. जिंकत असलेले उमेदवारही पराभूत घोषित करण्यात आले. पाकिस्तानातील न्यायपालिका आणि निवडणूक आयोगही यात सामील असल्याचा आरोप प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला होता. या आरोपाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली. त्यानंतर आता पाकिस्तानातून (Pakistan Election) आणखी एक मोठी बातमी आली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने निवडणुकीतील फसवणुकीच्या प्रकरणाच्या सुनावणीत राजधानीतील तीन मतदारसंघातील निवडणूक रद्द केली.

इम्रान खान यांच्या (Imran Khan) पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाने पुरस्कृत केलेल्या तीन उमेदवारांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. निवडणूक प्रक्रियेत गडबड झाल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यानंतर न्यायालयान एनए-46, एनए-47 आणि एनए-48 मतदारसंघातील निवडणूक निकाल रद्द केला. न्यायालयाने अंजुम अकील खान, तारिक फजल चौधर आणि राजा खुर्रम नवाज या विजयी उमेदवारांच्या विजयावरही बंदी आणल आहे.

Pakistan Election : पाकिस्तानच्या निवडणुकीत मोठ्ठा घोटाळा! ‘त्या’ आरोपांची होणार चौकशी

पाकिस्तानात 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अकील खान आणि तारिक चौधरी यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पक्षाकडून विजय मिळवला. तर नवाज यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला. त्यांना पीटीआय पक्षाचा पाठिंबा मिळाला नव्हता. या विजयानंतर ते पीएमएल-एन पक्षात सहभागी झाले. आता या विजयी उमेदवारांच्या विजयावर बंदी आणण्यात आली आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, याआधी रावळपिंडीचे माजी आयुक्त लियाकत चठ्ठा यांनी शहरातील निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांना विजयी केले गेले असा आरोप केला होता. रावळपिंडीत 13 उमेदवारांना जबरदस्तीने विजयी घोषित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाने 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हेराफेरी आणि पक्षाला दिलेला जनादेश हिसकावून घेण्याच्या विरोधात देशव्यापी निदर्शने सुरू केली असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Pakistan Elections : अखेर ठरलं! नवाज शरीफ यांची माघार, शहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे PM

निवडणूक आयोगाने या आरोपांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. रावळपिंडीचे नवनियुक्त आयुक्त सैफ अन्वर जप्पा यांनी मात्र निवडणुकीतील अनियमिततेचे आरोप फेटाळून लावले.

निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करत सिंध प्रांतात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडून निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही मिळाले. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीनंतर पीटीआय, जमात ए इस्लामीसह अन्य काही पक्ष दावा करत आहेत की त्यांच्या उमेदवारांना जाणूनबुजून पराभूत करण्यात आले. त्यामुळे निकाल कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही.

 

follow us