Download App

सीमा हैदरचा राग पाकिस्तानने हिंदू मंदिरांवर काढला, अंदाधुंद गोळीबार आणि रॉकेट लाँचर्सने हल्ले

Pakistan Hindu Temple: पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा हिंदू समुदायाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी एका हल्लेखोर टोळीने दक्षिण सिंध प्रांतात हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी सिंध प्रांतातील कश्मोर भागात स्थानिक हिंदू समुदायाने बांधलेल्या एका लहान मंदिरावर आणि अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या घरांच्या जवळपास हल्ला केला.

सीमा हैदरला पाकिस्तानात परत न पाठवल्यास मंदिरांवर हल्ला करण्याची धमकी एका पाकिस्तानी टोळींने दिली होती. यानंतर रविवारी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हल्लेखोरांनी मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला. हल्लेखोरांनी रविवारी मंदिरात अंदाधुंद गोळीबार केला, त्यानंतर कश्मोर-कंठकोटचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक इरफान सामो यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

पाकिस्तानमधील चार मुलांची आई असलेल्या सीमा हैदरने आपला देश सोडला आणि एका हिंदू व्यक्तीसोबत राहण्यासाठी भारतात आली. सीमा हैदर हिच्या पबजी प्रेमकथेचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानातील एका टोळीने काही दिवसांपूर्वी कश्मोर आणि घोटकी नदीच्या भागातील हिंदू प्रार्थनास्थळांवर आणि समुदायावर हल्ले करण्याची धमकी दिली होती.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह राज्यसभेच्या 11 जागा बिनविरोध, भाजप बहूमतापासून दूरच

2019 मध्ये ऑनलाइन गेम पबजी खेळताना सीमाची सचिन नावाच्या व्यक्तीशी मैत्री झाली होती आणि ती तिच्या प्रेमात पडली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय सीमा आणि 22 वर्षीय सचिन मीना दिल्लीजवळील ग्रेटर नोएडामधील रबुपुरा भागात राहतात. सचिन तेथे किराणा दुकान चालवतो.

दरम्यान, पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने (एचआरसीपी) म्हटले आहे की सिंधमधील कश्मोर आणि घोटकी जिल्ह्यांतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या वृत्तांबद्दल ते चिंतित आहेत. या भागातील महिला आणि मुलांसह हिंदू समुदायाच्या सुमारे 30 नागरिकांना संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी ओलीस ठेवले आहे. कराचीमध्ये अनेक प्राचीन हिंदू मंदिरे आहेत. पाकिस्तानमध्ये हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. पाकिस्तानातील बहुतेक हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात स्थायिक आहे.

Tags

follow us