Iran-US Deal : इराण-अमेरिका करार अपयश; चर्चा फिस्कटल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया काय?

Iran-US Deal : अमेरिका आणि इराण दरम्यान पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये 21 तास चाललेल्या चर्चेनंतरही दोन्ही राष्ट्रांमध्ये कोणताही करार होऊ

Iran US Deal

Iran US Deal

Iran-US Deal : अमेरिका आणि इराण दरम्यान पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये 21 तास चाललेल्या चर्चेनंतरही दोन्ही राष्ट्रांमध्ये कोणताही करार होऊ शकला नाही. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीने ही चर्चा निष्फळ ठरल्याचे जाहीर करत पाकिस्तान सोडले आहे. यानंतर अमेरिकेच्या मागण्या मान्य नसल्याने या चर्चेतून कोणताही ठोस परिणाम साध्य होऊ शकला नाही अशी प्रतिक्रिया इराणकडून देण्यात आली आहे. तर या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानची देखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पाकिस्तान काय म्हणाला?

दोन्ही राष्ट्रांमध्ये अर्थपूर्ण संवाद घडवून आणण्याचे आपले प्रयत्न ते यापुढेही सुरू ठेवतील. त्यांनी दोन्ही बाजूंना शस्त्रसंधीचे पालन करण्याचे आवाहन केले. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी नमूद केले की, 24 तासांच्या कालावधीत अनेक फेऱ्यांमध्ये अर्थपूर्ण चर्चा पार पडली. फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि त्यांनी (दार यांनी) दोन्ही पक्षांमधील मतभेद मिटवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. प्रादेशिक शांतता आणि हिताच्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी विधायक भूमिका कायम ठेवली पाहिजे अशी प्रतिक्रिया पाकिस्तानकडून देण्यात आली आहे.

जे.डी. व्हान्स काय म्हणाले?

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी असे नमूद केले की, 21 तासांहून अधिक काळ अथक प्रयत्न करूनही, दोन्ही बाजू आपल्या मतभेद मिटवण्यात अपयशी ठरले. “आम्ही यावर 21 तास काम केले आहे आणि आनंदाची बातमी अशी की, आमच्यात अनेक अर्थपूर्ण चर्चा झाल्या आहेत. दुर्दैवाची बातमी अशी की, आम्ही कोणत्याही करारापर्यंत पोहोचू शकलो नाही. आम्ही कोणत्या गोष्टींवर तडजोड करण्यास तयार आहोत आणि कोणत्या गोष्टींवर नाही, याविषयीच्या आमच्या मर्यादा आम्ही स्पष्ट केल्या आहेत.आमच्या अटी स्वीकार न करण्याचा निर्णय घेतला.” असं जे.डी. व्हान्स म्हणाले.

Exit mobile version