Pakistan : पाकिस्तानात मोठा हल्ला! हवाई तळात दहशतवाद्यांची घुसखोरी, गोळीबार सुरू

Pakistan : पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियांवली येथील हवाई तळावर हल्लेखोरांसह दहशतवादी घुसले असून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत जोरदार गोळीबार सुरू झाला आहे. या हल्ल्याने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणांना हाय […]

Pakistan

Pakistan

Pakistan : पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियांवली येथील हवाई तळावर हल्लेखोरांसह दहशतवादी घुसले असून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत जोरदार गोळीबार सुरू झाला आहे. या हल्ल्याने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. या घटनेनंतर व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागले आहेत. या व्हिडिओत जोरदार गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी अजूनपर्यंत कुणीही घेतलेली नाही.

Nepal Earthquake : नेपाळमध्ये शक्तिशाली भूकंप! 129 जणांचा मृत्यू, भारतातही हादरे

हवाई दलावर हा हल्ला झाला असून घातक शस्त्रात्रे घेऊन दहशतवादी घुसले आहेत. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. एअरबेसच्या आत प्रचंड आग आणि धूर दिसत आहे. आत्मघाती हल्लेखोर शिडी लावून आत घुसले त्यानंतर त्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. एकामागोमाग एक बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू येऊ लागले. पाकिस्तानच्या लष्कराकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या हल्ल्यात आतापर्यंत चार दहशतवाद्यांना मारण्यात आल्याची माहिती पाकिस्तानातील स्थानिक मीडियाने दिली आहे.

Exit mobile version