Pok Rawalakot protest : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओकेमध्ये) (Pok Rawalakot protest) जवळपास 1.5 लाख नागरिकांनी पाकिस्तान सरकारविरोधात थेट रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलन जोर धरु लागल्यानंतर पाकिस्तान सरकारने राजद्रोहाचा आरोप ठेवत 4 आंदोलनकर्त्या नेत्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. संयुक्त अवामी अॅक्शन कमेटीच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे. त्यामुळे पीओकेमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालीयं.
संयुक्त अवामी अॅक्शन कमेटी या संघटनेवर काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान सरकारकडून बंदी घालण्यात आली. या संगटनेकडून पाकिस्तान प्रशासनाचा कडाडून विरोध करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकार या संगघटनेचा आवाज दाबत असल्याचा आरोप या संघटनेकडू करण्यात आला आहे.
5 जूनपासून या आंदोलनाला सुरुवात झाली असून विविध मागण्यांसाठी पाकिस्तानातील लोकं रस्त्यावर उतरले आहेत. राखीव जागांना विरोधासह वीज, गहू-ज्वारी आटा, तांदूळ, डाळी स्वस्त दरात उपलब्ध कराव्यात, मोफत आरोग्य सेवा अशा मागण्या आहेत. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कडक कारवाई करण्यात केलीयं. पाकिस्तानातील रावलकोट, बाग, हटियान बाला, कोटली, मीरपूर, सुधनोती, धीरकोट, डड्याल, मुजफ्फरबादमध्ये आंदोलन सुरु आहे. हातात बॅनर आणि दांडे घेत नागरिक रस्त्यावर उतरले असून आपल्या अधिकारांसाठी ते लढत आहेत.
नाशिक विधान परिषदेतून गोकुळ गीतेंनी शेवटच्या क्षणी शस्त्र म्यान का केलं? वाचा पडद्यामागची स्टोरी
जुलैमध्ये व्याप्त काश्मीरच्या ४५ सदस्यीय विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. यात काश्मीरच्या निर्वासितांसाठी १२ जागा राखीव ठेवल्याने स्थानिकांचे प्रतिनिधित्व कमी होईल, असा जनतेचा दावा आहे. जम्मू-काश्मीर ज्वाइंट अवामी ॲक्शन कमिटीने (जेएएसी) राखीव जागांना विरोध केला आहे. यासाठी रावळकोटच्या दिशेने हजारो निदर्शक निघाले आहेत.
दरम्यान, ३८ मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. राखीव जागांना विरोधासह वीज, गहू-ज्वारी आटा, तांदूळ, डाळी स्वस्त दरात उपलब्ध कराव्यात, मोफत आरोग्य सेवा अशा मागण्या आहेत. याशिवाय मंगला डॅम वीज प्रकल्पाला जनतेचा विरोध आहे. हा पाकिस्तानचा भूभाग नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
