Pakistan : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची (Pakistan) आणि त्या देशातील नागरिकांची जगात काय किंमत आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आताही पाकिस्तान्यांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा प्रकार अमेरिकेत केला आहे. त्यामुळे पाकिस्तानी (India vs Pakistan) अधिकाऱ्यांना अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमातून हाकलून देण्यात आले.
वॉशिंग्टन डीसी येथील प्रेस क्लबमध्ये काश्मीरमधील (Jammu Kashmir) बदलाच्या विषयावर चर्चा सुरू होती. इंटरनॅशनल सेंटर फॉर पीस स्टडीजने याचे आयोजन केले होते. यावेळी काश्मीरमध्ये राहणाऱ्या काही लोकांना बोलावण्यात आले होते. आपल्या भाषणात त्यांनी काश्मीरमध्ये केंद्र सरकारकडून होत असलेल्या विकासकामांचे आणि चांगल्या बदलांचे कौतुक करण्यास सुरुवात केली. मग काय, तिथे उपस्थित काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांना ही स्तुती आवडली नाही. त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले.
हे वाचा : NIA Action : नागपूरमध्ये दोघे पाकिस्तानच्या संपर्कात, एनआयएच्या धाडीत धक्कादायक माहिती
इंटरनॅशनल सेंटर फॉर पीस स्टडीजने वॉशिंग्टन डीसी प्रेस क्लबमध्ये ‘काश्मीर-फ्रॉम टर्मोइल टू ट्रान्सफॉर्मेशन’ या विषयावर पॅनल डिस्कशन आयोजित केले होते. पॅनेलमध्ये जम्मू काश्मीर वर्कर्स पार्टीचे अध्यक्ष मीर जुनैद आणि जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला नगरपरिषदेचे अध्यक्ष तौसीफ रैना यांचाही समावेश होता. मीर बोलत असताना काही पाकिस्तानी उभे राहिले आणि त्यांनी गोंधळ घातला.
#WATCH | Pakistanis heckle, interrupt discussion on Kashmir’s transformation in Washington DC’s National Press Club pic.twitter.com/I5OHEL6s9I
— ANI (@ANI) March 24, 2023
याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानी व्यक्ती खूप चिडलेला दिसत आहे. काही लोक त्याला बाहेर ढकलत आहेत. या दरम्यान पाकिस्तानी ओरडत आहे की भाषण स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे. पाकिस्तानी व्यक्तीच्या या कृतीवर काश्मीरच्या वक्त्यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली. आज तुझा खरा चेहरा संपूर्ण प्रेक्षकांनी पाहिला.
आपण काश्मीरमध्ये काय पाहिले, आज वॉशिंग्टनमध्ये काय पाहिले आणि आज हे लोक किती क्रूर आहेत हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. काश्मीरच्या विध्वंसामागे तुम्हीच लोक आहात हे लोकांना दिसत आहे. हेच लोक जम्मू-काश्मीरचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
मी पंतप्रधान मोदींना विनंती करेन, माजी पाकिस्तानी कर्णधार आफ्रिदीचं मोठं विधान
या मुद्द्यावर बोलताना मीर जुनैद म्हणाले, ‘मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की काश्मीरचा पुनर्जन्म शांतता, समृद्धी आणि प्रगतीचे राज्य म्हणून झाला आहे. जम्मू आणि काश्मीरने अनेक बदल पाहिले आहेत. पाकिस्तानवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, ‘आम्हाला आता वादग्रस्त विधानांच्या पलीकडे पाहावे लागेल. जे देश जागतिक व्यासपीठावर जगाला मूर्ख बनवण्याचे ढोल वाजवत आहेत त्यांना काश्मीरच्या शांतता, प्रगती आणि समृद्धीशी काहीही देणेघेणे नाही. काश्मीर ही त्यांच्यासाठी अस्तित्वाची समस्या आहे हे सत्य स्वीकारा आणि म्हणूनच त्यांना काश्मीरमध्ये हिंसाचाराची आग पेटवत ठेवायची आहे.