Download App

Narendra Modi : पाकिस्तानी पण म्हणाले; मोदी है तो मुमकीन है

PM Narendra Modi :  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय राजकारण्यांपैकी एक आहेत. मोदींची प्रशंसा करणारे लोक पाकिस्तानातही आहेत. पाकिस्तानी मुस्लिमांचे असे अनेक समुदाय आहेत जे मोदींची स्तुती करत असतात. सध्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे एनआयडी फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘विश्व सद्भावना कार्यक्रमात’ पाकिस्तानींच्या तोंडून ‘मोदी है तो मुमकिन है…’चा नाद घुमत आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भारतीय अल्पसंख्याक फाउंडेशन (IMF), NID फाउंडेशन (दिल्ली) आणि ऑस्ट्रेलियातील नामधारी शीख सोसायटीने 23 एप्रिल रोजी जागतिक सद्भावना कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये धार्मिक नेते, विचारवंत, विद्वान, प्रचारक आणि संशोधक सहभागी झाले होते. त्याचवेळी विविध धार्मिक समुदायातील पाकिस्तानी लोकही आले होते. त्यातील अनेक अहमदिया मुस्लिम समाजाचे होते.

https://letsupp.com/national/nitish-kumar-mamata-banerjee-meeting-gives-edge-to-opposition-unity-38372.html

पाकिस्तानातील अहमदिया समुदायाच्या मुस्लिमांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की मोदीजींचे “सर्व समुदायांचा आदर करणे” आम्हाला आवडले आहे, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यात आहे. म्हणूनच आम्ही त्याची स्तुती करतो.

लाहोरचे अहमदिया मुस्लिम समुदायाचे सदस्य डॉ. तारिक बट म्हणाले, “मी वैयक्तिकरित्या असे म्हणू शकतो की माझे बरेच मित्र भारतीय आहेत आणि मी त्यांना अनेक उपक्रम एकत्र करताना पाहिले आहेत. मी स्वतः त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो. मला वाटते, आता भारतीय मुस्लिम आणि पाकिस्तानी मुस्लिम यांच्यात एकोपा वाढत आहे. त्यांच्यात परस्पर संवाद वाढत आहे. आम्हाला या दोघांत फरकांपेक्षा समानता आणायची आहे.”

ते पुढे म्हणाले, “हा पंतप्रधान मोदींचा करिष्मा आहे की जिथे लोक त्यांच्या धार्मिकतेची पर्वा न करता त्यांचे अनुसरण करतात, हे चांगले आहे!” ते म्हणाले, मी माझ्या बाजूने म्हणेन की मोदी है तो मुमकिन है.

पाकिस्तानध्ये सत्ता पुन्हा लष्कराच्या ताब्यात जाणार, माजी पीएम अब्बासी यांचा इशारा

त्याचप्रमाणे, कराचीतील दाऊदी बोहरा मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधी, तहर शाकीर म्हणाले, “आमच्याकडे अलीकडेच एक कार्यक्रम झाला जिथे आमच्या विद्यापीठाचा एक नवीन अध्याय – मरोळ, मुंबई येथे अल्जामिया-तुस-सैफियाह हा झाला, आणि यासाठी मोदीजी स्वतः आले. त्यांनी आम्हाला सांगितलेल्या गोष्टी म्हणजे कृपया मला फार आदराने बोलवू नका, मी तुमच्या घराचा एक भाग आहे, असे ते म्हणाले आहेत.

follow us