Download App

Operation Sindoor : आपण भारताचं एकही मिसाईल रोखू शकलो नाही, पाकिस्तानी तरूणाने काढले आपल्याच देशाचे वाभाडे

Pakistani Social Media User Admits Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवून भारतीय लष्कराने पाकिस्तानला पाणी पाजलंय. पाकिस्तानी (Pakistan) नागरिक भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करताना दिसत आहे. त्यांनी स्वत:च्याच देशावर टीका केली आहे.भारताने पाकिस्तानवर मिसाईल डागले. परंतु एकही मिसाईल पाकिस्तान रोखू शकले नाही, अशी खदखद पाकिस्तानी (India Pakistan Tension) जनता व्यक्त करताना दिसत आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलाय.

एका पाकिस्तानी नागरिकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यामध्ये पाकिस्तानी सैन्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताने पाकिस्तानच्या घरात घुसून हल्ला केला आहे, असे त्याचे मत आहे. भारत सरकारने बुधवारीच सांगितले होते की, हल्ल्यानंतर त्यांचे सर्व वैमानिक सुरक्षित परतले आहेत.आता पाकिस्तानी जनता देखील यावर विश्वास ठेवताना दिसत आहे.

Operation Sindoor : हुजूर अब बख्श दीजिए! ऑपरेशन सिंदूरचा दणका बसताच पाकिस्तान वठणीवर

दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक पाकिस्तानी नागरिक म्हणत आहे की, भारताने पाकिस्तानवर 25 क्षेपणास्त्रे डागली आहेत. सर्व क्षेपणास्त्रे त्यांच्या लक्ष्यावर आदळली आहेत. भारताने ठरवलेले लक्ष्य साध्य केले आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आपली (पाकिस्तानची) संरक्षण व्यवस्था भारताकडून होणारा एकही हल्ला रोखू शकलेली नाही. मी भारताची प्रशंसा करतोय असं नाही तर, मी फक्त खरं बोलतोय असं म्हणताना ही व्यक्ती दिसत आहे.

भारताने आपल्या घरात घुसून हल्ला केला. आपण त्यांची क्षेपणास्त्रे थांबवू शकलो नाही. इस्रायल सर्व क्षेपणास्त्रे रोखतो. पाकिस्तान एकही क्षेपणास्त्र रोखू शकला नाही. भारताने अद्याप पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही तळाला लक्ष्य केलेले नाही. कोणत्याही छावणीवर हल्ला झाला नाही. जर हा हल्ला GHQ (लष्कर मुख्यालय) वर झाला असता, तर हा आतापर्यंत कार्यक्रम झाला असता. जर क्षेपणास्त्र इतरत्र सोडले असते, तर ते कोणी थांबवले असते? आम्ही एकही क्षेपणास्त्र थांबवू शकलो नाही, असं ही व्यक्ती म्हणताना दिसत आहे.

लष्करी सैनिकांना रिफंड देणार, रि-बुकिंगसाठीही शुल्क नाही, सैनिकांच्या कर्तव्याला सलाम करत Air India चा निर्णय

ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला पुरतं हादरवून टाकलंय.भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने हा हल्ला करण्यात केला आहे. पहलगाम हल्ल्यात 26 लोक मारले गेले होते. त्यांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी भारताने हा हवाई हल्ला केला आहे. ज्यामुळे आता पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली आहे, तेथील नागरिक देखील पाकिस्तान सरकारविरोधात संताप व्यक्त करीत आहेत. लष्करावर प्रश्न उपस्थित करीत आहेत.

 

follow us