America Iran War : ‘शांतता करार’ फत्ते! अमेरिकन सैन्याची माघार, तर होर्मुझही खुले?

शांतता करारानुसार अमेरिकन सैन्याने माघार घेतली आहे तर इराणही होर्मुझ खुले करणार असल्याने कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत.

Iran to shut the Strait of Hormuz

Iran to shut the Strait of Hormuz

America Iran War : शांतता करारानुसार अमेरिकन सैन्य पर्शियन आखातातून बाहेर पडले असून इराणही होर्मुझची नाकेबंदी (America Iran War ) हटवणार असल्याची माहिती इराणच्या वृत्तसंस्थेकडून देण्यात आलीयं. दोन्ही देशांमध्ये शांतता करार होताच कच्च्या तेलाच्या किमती घटल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती 5 टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्यामुळे आता युद्धजन्य परिस्थितीचा फटका जगाला बसणार नसल्याचं बोललं जात आहे.

America Iran War : आखातातील युद्धाबाबत मोठी अपडेट, इराणमधून अमेरिकी सैन्य माघार घेणार…

इराणी वृतसंस्थेच्या माहितीनुसार, ओमान आणि पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही देशांसमोर एक ‘शांतता मसुदा’ ठेवण्यात आला. दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव थांबवून चर्चेच्या टेबलवर यावे, यासाठी जागतिक पातळीवरून प्रचंड दबाव आणला जात आहे. शांतता मसुद्यात प्रामुख्याने ३ टप्प्यांचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला असून 60 दिवसांच्या युद्धविरामादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांवर आणि एकमेकांच्या लष्करी तळांवर सुरू असलेले थेट हल्ले तातडीने थांबवायचे आहेत. या ६० दिवसांच्या कालावधीत दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी शांतता करारासाठी एकत्र येणार आहेत.

-‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ खुले करणे आणि नाकेबंदी हटवणे…
इराणने आंतरराष्ट्रीय खनिज तेल व्यापाराची जीवनवाहिनी असलेल्या ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’मधील नाकेबंदी हटवावी. त्या बदल्यात अमेरिकेने इराणच्या बंदरांभोवती घातलेली आर्थिक आणि लष्करी नाकेबंदी पूर्णपणे हटवायची आहे.
-गोठवलेला निधी आणि आर्थिक निर्बंधांतून दिलासा
अमेरिकेच्या दबावामुळे विविध आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये गोठवून ठेवलेला इराणचा अब्जावधी डॉलर्सचा निधी टप्प्याटप्प्याने मोकळा केला जाईल आणि इराणवरील जाचक आर्थिक निर्बंध शिथिल केले जाणार आहेत.

Exit mobile version