गाझामध्ये शांतता, इस्त्रायल – हमासमध्ये स्वाक्षरी; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Gaza Peace Plan : गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेला इस्त्रायल - हमास युद्धामध्ये आता मोठी अपडेट समोर आली आहे. इस्त्रायल आणि हमासने गाझासाठी

Gaza Peace Plan

Gaza Peace Plan

Gaza Peace Plan : गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेला इस्त्रायल – हमास युद्धामध्ये आता मोठी अपडेट समोर आली आहे. इस्त्रायल आणि हमासने गाझासाठी शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर स्वाक्षरी केली आहे. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली आहे. इस्रायल आणि हमास यांनी आमच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर स्वाक्षरी केली आहे. सर्व बंधकांना लवकरच सोडण्यात येईल. इस्रायल आपले सैन्य एका मान्य रेषेवर मागे घेईल, मजबूत, चिरस्थायी आणि शाश्वत शांततेच्या दिशेने पहिले पाऊल टाकेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

सर्व पक्षांना न्याय्य वागणूक दिली जाईल. अरब आणि मुस्लिम जगत, इस्रायल (Israel) , आजूबाजूचे सर्व देश आणि अमेरिकेसाठी हा एक उत्तम दिवस आहे आणि ही ऐतिहासिक आणि अभूतपूर्व घटना शक्य करण्यासाठी आमच्यासोबत काम करणाऱ्या कतार, इजिप्त आणि तुर्कीमधील मध्यस्थांचे आम्ही आभार मानतो असं देखील ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तर दुसरीकडे अल जझीराच्या वृत्तानुसार, पॅलेस्टाईनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) लिहिलेल्या पत्रात इस्रायलवर गाझामध्ये “नरसंहार युद्ध” सुरू करण्याचा आरोप केला आहे. उर्वरित जग रक्तपात थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, इस्रायल गाझामधील पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध नरसंहाराचे युद्ध सुरूच ठेवत आहे. स्टेट ऑफ पॅलेस्टाईन एक्सवर म्हटले आहे.

गुंतवणूकदारांना दिलासा, निफ्टीने ओलांडला 25070 अंकांचा टप्पा; सेन्सेक्सची स्थिती काय? 

गाझामध्ये मृतांची संख्या 2,37,000 पेक्षा जास्त

ऑक्टोबर 2023 पासून केवळ गाझामध्ये मृतांची संख्या किमान 2,37,000 पेक्षा जास्त झाली आहे. बहुतेक घरे आणि नागरी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. पॅलेस्टाईनने म्हटले आहे की इस्रायलचे जीवन आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन थांबवले पाहिजे. या दुःखद दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त, आम्ही ही नरसंहार थांबवण्याची आमची मागणी पुन्हा मांडतो.

Exit mobile version