Download App

मृत्यूनंतरही परवेझ मुशर्रफ यांना माफी नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा कायम

Pervez Musharraf : पाकिस्तानच्या (Pakistan) सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोहाच्या खटल्यात माजी लष्करी प्रमुख परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. पाकिस्तानच्या विविध मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कारगिल युद्धाचे (Kargil War) सूत्रधार मानले जाणारे परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे गेल्या वर्षी 5 फेब्रुवारीला दुबईत दीर्घ आजाराने निधन झाले होते. पाकिस्तानमध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवरील शिक्षा टाळण्यासाठी तो 2016 पासून दुबईत राहत होते.

पाकिस्तानचे सरन्यायाधीश काझी फैज इसा यांच्या अध्यक्षतेखालील चार न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर परवेझ मुशर्रफ यांचा समावेश असलेल्या खटल्याची सुनावणी झाली. या खंडपीठात न्यायमूर्ती मन्सूर अली शाह, न्यायमूर्ती अमिनोद्दीन खान आणि न्यायमूर्ती अतहर मिनाल्ला यांचा समावेश होता. 17 डिसेंबर 2019 रोजी पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने परवेश मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. 2007 मध्ये असंवैधानिक आणीबाणी लागू केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) पक्ष सत्तेत होता.

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमध्ये ब्रेक, सरकारने दिले ‘हे’ कारण

माजी राष्ट्रपतींनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, परवेझ मुशर्रफ यांच्या वारसांनी अनेक नोटिसा मिळाल्यानंतरही या प्रकरणाचा पाठपुरावा केला नाही. परवेझ मुशर्रफ यांचे वकील सलमान सफदर यांनी सांगितले की, त्यांनी मुशर्रफ यांच्या कुटुंबीयांशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

follow us