South Korea Plane Crash : दक्षिण कोरियातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. रॉयटर्सने योनहाप न्यूज एजन्सीच्या हवाल्याने सांगितले की दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान रनवे वरून खाली उकरुन एका भिंतीला धडकले. या भीषण अपघातात विमानातील 179 प्रवाशांचा जागीच झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की या दुर्घटनेत विमानाचे मोठे नुकसान पाहता मृत्यूंच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
आश्चर्यच! डासांना पकडण्यासाठी बॉर्डरवर ट्रॅकिंग डिव्हाईस; ‘या’ आजाराने दक्षिण कोरिया हैराण
⚡️DRAMATIC moment South Korean plane with reported 180+ passengers becomes a fireball and crashes at airport CAUGHT on cam pic.twitter.com/VdrdavEXgT
— RT (@RT_com) December 29, 2024
योनहाप न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार जेजू एयरचे हे विमान थायलंडहून माघारी येत होते. विमान लँडिंग होत असताना ही दुर्घटना घडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातानंतर परिसरात आग लागली होती. ही आग आता आटोक्यात आणण्यात आली आहे.
ही दुर्घटना एका पक्षाच्या संपर्कात आल्याने घडली असावी अशी शक्यता योनहाप न्यूज एजन्सीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. यामुळे विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला. हे विमान मुआन विमानतळावर लँडिंग करत होते. The Guardian नुसार दक्षिण कोरियाचे कार्यवाहक राष्ट्रपती चोई सांग मोक यांनी सांगितले की या दुर्घटनेतील प्रवाशांच्या मदतीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.
याआधी 25 डिसेंबर रोजी अजरबैजान एअरलाइन्सचे एक जेट विमान कजाकस्तानच्या अक्तौ जवळ दुर्घटनाग्रस्त झाले होते. या विमानात 67 प्रवासी होते. यांपैकी 38 प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता.