Donald Trump : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणदरम्यान सुरु असणाऱ्या संघर्षामुळे जगाच्या चिंतेत वाढ झाली आहे. या संघर्षामुळे जागतिक अर्थवव्यवस्थेवर देखील मोठा परिणाम होताना दिसत आहे. तर आता दोन्ही देशांच्या संघर्षामध्ये एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नियोजित मोठा हल्ला रद्द केला आहे. अमेरिकेच्या बाजूने असणाऱ्या सौदी अरेबियाने केलेल्या आवाहनानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठा निर्णय घेत हल्ला रद्द केला आहे. हा संघर्ष अधिन व वाढवण्याचा सल्ला सौदी अरेबियाने अमेरिकेला दिला होता.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman) यांनी हा संघर्ष अधिन व वाढवण्याची भूमिका अमेरिकेसमोर मांडली होती. याच भूमिकेमुळे अमेरिकेने इराणवरील नियोजित मोठा हल्ला रद्द केल्याचेही अहवालांवरून दिसून येते. यापूर्वी, क्राउन प्रिन्स यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा केली होती आणि इराणवरील नियोजित हल्ल्याच्या व्याप्तीबद्दल विचारणा केली होती. या आठवड्यात अमेरिका (America) आणि सौदी अरेबियाने (Saudi Arabia) संयुक्तपणे इराणच्या अनेक ठिकाणांवर हल्ले केले होते. तसेच, क्राउन प्रिन्स यांनी त्यांचे बंधू आणि संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान यांना वॉशिंग्टनला पाठवले होते. तिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांची भेट घेतली.
अमेरिकेचा आपल्या नागरिकांना इशारा
इराणसोबत वाढत्या तणावामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना पश्चिम आशिया सोडण्याचा सल्ला देणारा इशारा जारी केला आहे. जेरुसलेम आणि विविध पश्चिम आशियाई देशांच्या राजधानींमधील अमेरिकन दूतावासांनी एकसारखे सुरक्षा इशारे जारी करून अमेरिकन नागरिकांना या भागात प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे.
Jumanji: Open World चा ट्रेलर प्रदर्शित ; ॲक्शन, विनोद आणि नव्या साहसाची झलक-
‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’वरील (होर्मुझची सामुद्रधुनी) नियंत्रणावरून आता हे दोन देश आमनेसामने आले आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी इराणवर अमेरिकेसोबत झालेल्या युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.
