Download App

PM Modi वरील टीकेचा मालदीव टुरिझम इंडस्ट्रीकडून निषेध; प्रत्येक संकटात भारतच येतो धावून

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटांना (Lakshadweep Island) भेट दिली. या भेटीदरम्यान मोदींनी तेथील समुद्रकिनाऱ्यांवर स्वत:चे काही फोटो काढून ते शेअर केले. त्यावेळी त्यांनी पर्यटकांना (tourists)लक्षद्विपला भेट देण्याचं आवाहन देखील केलं. मात्र त्यावरून मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय पर्यटनावर अपमानजनक टीप्पण्णी केली. त्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.

Ayodhya Ram Mandir : जाणून घ्या अयोध्या नगरीचा इतिहास : LetsUpp Marathi

त्या दरम्यान आता मालदीवच्या मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्री (MATI) या संस्थेने आपल्या या मंत्र्यांच्या पंतप्रधान मोदी यांच्यावरील या खालच्या पातळीवरील टीकेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी एक पत्रक जारी करत म्हटले आहे की, मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्री ही मालदीवच्या मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताबद्दल केलेल्या अपमानजनक तव्याचा तीव्र निषेध करत आहोत. भारत हा आमचा अत्यंत जवळचा शेजारी आहे.

Ahmednagar News : निवडणुकांच्या तोंडावर विखेंकडून निधी मंजुरीचा धडाका; जिल्हा विकासासाठी 630 कोटी मंजूर

भारताने आमच्या प्रत्येक संकटात आम्हाला सर्वात पहिल्यांदा मदत केली आहे. भारत सरकार आणि भारतातील लोकांनी आमच्या सोबत अत्यंत चांगले संबंध प्रस्थापित केलेले आहेत. तसेच मालदीवमधील पर्यटन क्षेत्रामध्ये भारताचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच कोरोनानंतर आम्ही पुन्हा एकदा उभे राहू शकलो. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही वक्तव्य ही भारत आणि मालदीव या दोन देशांमधील चांगलं संबंध यावर वाईट परिणाम करू शकतात.

काय आहे नेमकं प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौरा (Lakshadweep) केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून (Maldives) अत्यंत खालच्या भाषेत टीका (India Maldives Tension) करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे शब्द वापरले.

मालदीव सरकारनेही या प्रकाराची गंभीर दखल घेत टीका करणाऱ्या मंत्री शिउनासह आणखी दोन मंत्र्यांना (Ministers) निलंबित केले. मात्र तरीदेखील हा वाद शांतता झालेला नाही. मालदीवमधील विरोधी पक्षांनी हे प्रकरण उचलून धरले असून आता थेट राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.

follow us

वेब स्टोरीज