Protests, violence and attacks; Who is Sharif Osman Hadi? After whose death, Bangladesh is on fire again : बांगलादेशमधील राजकारण आणि विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित पुन्हा एक मोठी घटना समोर आली आहे. कारण गेल्या वर्षी 2024 मधील चर्चत आलेल्या विद्यार्थी आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या विद्यार्थी नेत्याचं गुरूवारी 18 डिसेंबर 2025 ला निधन झालं आहे. या घटनेनंतर संपूर्ण बांगलादेश शोक आणि तणावाच्या वातावरणात आहे. तसेच बांगलादेशात तरूणाई पुन्हा एकदा रस्त्यावर आली आहे. निदर्शन केली जात आहेत.
T20 World Cup 2026 साठी ‘या’ दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा; संजू सॅमसनला मिळणार संधी?
शरीफ उस्मान हादी असं या विद्यार्थी नेत्याचं नाव असून तो शेख हसीना यांच्या विरोधी उभी ठाकलेल्या इंकलाब मंच संस्थेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होता. सिंगल सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार शरीफ उस्मान हादी याला 15 डिसेंबर 2025 ला आपत्कालीन परिस्थितीमध्ये सिंगापूरमध्ये आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेहरू सर्जिकल आयसीयूमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. या ठिकाणी त्याच्यावर राष्ट्रीय तंत्रिका विज्ञान संस्था या ठिकाणच्या विशेषज्ञ डॉक्टरांच्या टीमने उपचार केले. मात्र सर्व उपचार आणि प्रयत्नांच्यानंतर देखील त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. अखेर 18 डिसेंबरला त्याने अखेरचा श्वास घेतला.
शरीफ उस्मान हादी कोण आहे?
शरीफ उस्मान हादी हा शेख हसीना यांच्या विरोधी उभी ठाकलेल्या इंकलाब मंच संस्थेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होता. तो या संस्थेचा प्रवक्त्या होता तसेच तो आगामी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये ढाका-8 या जागेवरून अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करत होता. जुलै 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थ्या आंदोलनादरम्यान ‘इंकलाब मंच राष्ट्रीय‘ ही संस्था चर्चेत आली होती. ज्यातून तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तेला आव्हान देण्यात आलं होतं. उस्मान हादीचा जन्म बांगलादेशातील झलकाठी जिल्ह्यात झाला होता. त्याचं कुटुंब धार्मिक आणि साधारण जीवन जगणार होतं त्याचे वडील मदरसामध्ये शिक्षक होते. त्यांनी त्याला शिस्त, अभ्यास आणि नैतिक मूल्य त्यांनीच शिकवली. त्याचं प्रारंभिक शिक्षण नेसराबाद कामिल मदरसा येथे झालं
अक्षया नाईकचं टेलिव्हीजनमधून इंडस्ट्रीत पदार्पण; थेट इम्रान हाश्मीसोबत करणार ‘तस्करी’
तर इंकलाब मंच हा बांगलादेशच्या राजकारणामध्ये कायम वादात राहिला. अनेक वेळा हा गट कट्टरपंथी विचारधारेचा मानला गेला. विद्यार्थी आंदोलनानंतर निर्माण करण्यात आलेल्या अंतरिम सरकारने या संस्थेला भंग केलं. तसेच निवडणुका लढण्यासाठी बंदी घातली. त्यानंतर देखील या संस्थेचे नेते वारंवार राजकीय सक्रिय होते.
मतदान केंद्र असलेल्या शाळांना 19 व 20 डिसेंबरला सुट्टी; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे आदेश
दरम्यान ज्या हल्ल्यामध्ये हादीचा मृत्यू झाला. तो हल्ला 12 डिसेंबर 2025 रोजी ढाकामध्ये झाला होता. त्यामध्ये हा पलटन या भागातून कल्वरट रोड येथून रिक्षाने जात होता. त्यावेळी अज्ञातांनी त्याच्यावरती गोळीबार केला. ही गोळी त्याच्या डोक्यामध्ये लागली होती. त्यामध्ये तो गंभीर स्वरूपात जखमी झाला होता. त्यानंतर त्याला तात्काळ ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर चांगल्या उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तरी देखील त्याच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती. त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला सिंगापूर एअरलिफ्ट करण्यात आले. तेथे देखील अनेक उपचारांच्या शेवटी त्याचा मृत्यू झाला.
