Download App

USA : अमेरिकेलाही पावसाचा फटका, ‘व्हरमाँट’ शहर पुराच्या विळख्यात

  • Written By: Last Updated:

USA : अमेरिकेतील व्हरमाँट (Vermont) आणि ईशान्येच्या इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू चाहे. दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने राज्याच्या राजधानीसह काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. शहरातील रस्त्यांवर पाणी साचलं आहे. दरम्यान, आता धरण ओव्हरफ्लो होण्याचा धोका निर्माण झाला. याविषयी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुरामुळे लाखो डॉलर्सचे नुकसान झाले असून असाच पावसाचा जोर कायम राहिला तर आणखी मोठ्या नुकसान होण्याची शक्यता आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास मॉन्टपेलियरमधून वाहणाऱ्या विनोस्की नदीवरील (Winooski River) धरणावरून साडंवा जाऊ शकतो. त्यामुळं ज्या भागात पुरस्थिती नाही, त्या भागात धरणाचे पाणी घुसू शकते. (Rain wreaks havoc in Vermont in USA rescue teams rescue more than 100 people)

मुसळधार पावसामुळं अमेरिकेच्या व्हरमाँट शहरात पुराचा कहर पाहायला मिळत आहे. गव्हर्नर फिल स्कॉट म्हणाले, “राजधानीसारख्या काही ठिकाणी पुराचे पाणी वाढतच आहे आणि आयरीन चक्रीवादळाच्या वेळी पाहिलेल्या पातळीपेक्षा जास्त आहे. ऑगस्ट 2011 मध्ये, आयरीनमुळं व्हरमाँटमध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला. आयरीन चक्रीवादळामुळे घरे उध्वस्त झाली आणि 200 हून अधिक पूल आणि 500 ​​मैल महामार्गाचे नुकसान झाले होते.

बिल न भरल्याने पारघरमधील 443 शाळांची वीज कापली; विद्यार्थी करतायत अंधारात अभ्यास 

गुरुवार आणि शुक्रवारी जोरदार पावसाची शक्यता

आज कडक ऊन अपेक्षित आहे. मात्र गुरुवार आणि शुक्रवारी आणखी पावसाचा अंदाज होता. स्कॉट म्हणाले मंगळवारी सकाळी त्यांच्या घराच्या आजूबाजूचे रस्त्यांवर पाणी होतं. त्यामुळे त्यांना राज्याच्या आपत्कालीन केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलातून चालत जावे लागले.

न्यूयॉर्कमध्ये एक महिला वाहून गेली. वर्माँट आपत्कालीन व्यवस्थापनाने मंगळवारी सांगितले की वर्माँटमध्ये पुरामुळे जखमी किंवा मृत्यू झाल्याची कोणतीही बातमी नाही. मात्र, न्यूयॉर्कमध्ये पुरस्थिती असल्यानं लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. नॅशनल गार्ड हेलिकाप्टरच्या मदतीने पथकाने मदतीने 100 हून अधिक लोकांना वाचवले. त्याच बरोबर कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने पुरस्थितीचा धोका असलेले रस्ते बंद केले.

लिथुआनियामधील वार्षिक NATO शिखर परिषदेला उपस्थित असताना, अध्यक्ष जो बायडेन यांनी व्हरमाँटसाठी आणीबाणीची स्थिती घोषित केली आणि आपत्ती निवारण प्रयत्नांमध्ये समन्वय आणि मदत करण्यासाठी फेडरल आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीला अधिकृत केले.

Tags

follow us

वेब स्टोरीज