पंतप्रधान मोदींच्या युएई दौऱ्यात भारताला दिलासा! भारत-युएईमध्ये LPG पुरवठा अन् संरक्षण संबंधित करार

PM Modi's UAE visit भारतासाठी एलपीजी संदर्भात एक महत्त्वाचा करार झाल्याने युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिलासा दायक मानले जात आहे.

PM Modi's UAE Visit

PM Modi's UAE Visit

Relief for India during PM Modi’s UAE visit India-UAE sign LPG supply and defense agreements : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच दिवसीय परराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यात आज पहिल्या दिवशी त्यांनी युनायटेड अरब अमिराती या देशाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये भारतासाठी एलपीजी संदर्भात एक महत्त्वाचा करार झाल्याने युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिलासा दायक मानले जात आहे.

शरद पवार शेवटचा डाव टाकणार! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार… पुण्यातल्या गुप्त बैठकीचं गुपित काय?

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने युनायटेड अरब अमिरातीसोबत एलपीजी (LPG) पुरवठ्यासंदर्भात एक महत्त्वाचा धोरणात्मक करार केला आहे. या करारामुळे युद्धजन्य परिस्थितीत इंधन पुरवठ्यावर होणारा परिणाम कमी करण्यास मदत होणार आहे.

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; कांदा खरेदीसह शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एलपीजी आयातदार असलेल्या भारतासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जागतिक तणाव आणि युद्धामुळे ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेता भारताने ही पावले उचलली आहेत. हा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केवळ दोन तासांच्या युएई दौऱ्यात करण्यात आला.

कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द

एलपीजी करारासोबतच दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याबाबत सामंजस्य करार (MoU) देखील करण्यात आला. विशेष म्हणजे, भारतात १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ जाहीर झाल्यानंतर काही तासांतच हा करार घोषित करण्यात आला, त्यामुळे या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अबू धाबी येथे झालेल्या या झटपट दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली.

वेलकम टू द जंगलचा टीझर रिलीज; कॉमेडी, गोंधळ आणि नॉन-स्टॉप हास्याचा धमाका!

भारत-नॉर्डिक शिखर परिषदेला जाताना केलेल्या या थांब्यात भारत आणि युएईयांच्यात ऊर्जा सुरक्षेसोबतच संरक्षण भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे मोदी यांच्या या अल्पकालीन दौऱ्याने भारतासाठी मोठे आर्थिक आणि धोरणात्मक फायदे मिळाल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version