Russian Scientists Working On World’s First Anti-Aging Vaccine : काळाची चक्रं उलटी फिरवून कायमस्वरूपी तरुण राहणं आता केवळ कल्पनाविलास उरलेला नाही. निसर्गाच्या नियमांना थेट आव्हान देत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी चक्क ‘वृद्धत्वावर विजय’ मिळवण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. रशियाच्या ‘बायोलॉजी ऑफ एजिंग अँड मेडिसिन इन्स्टिट्यूट’मध्ये हे संशोधन अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे रशियात सुरू असलेलं हे संशोधन यशस्वी झालं तर, मनुष्य थोडा थोडका नव्हे तर, तब्बल 150 वर्ष जगू शकेल. नेमकं हे औषध काय? ते कसं काम करणार याबद्दल जाणून घेऊया…
GOLD प्रचंड स्वस्त होणार! RBI चे भल्या मोठ्या दोन पानी रिपोर्टमध्ये संकेत; अनेकांच्या पोटात गोळा…
पुतिन यांचा ‘अमर’ होण्याचा ध्यास
73 वर्षीय व्लादिमीर पुतिन यांचा दीर्घायुष्याबाबतचा ध्यास सर्वश्रुत आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये एका AI समिटमध्ये बोलताना त्यांनी म्हटले होते की, “माणूस 150 वर्षांपर्यंत जगू शकतो.” पुतिन यांना केवळ दीर्घायुष्यच नको आहे, तर त्यांना कायम तरुण दिसायचे आहे. एवढेच काय तर, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या एका खासगी चर्चेत पुतिन यांनी ‘अवयव प्रत्यारोपण’ करून तरुण राहण्याच्या शक्यतेवरही चर्चा केली होती, असे म्हटले जाते.
शास्त्रज्ञांवर सरकारचा दबाव
एकीकडे मनुष्य अमर कसा होईल यावर युद्धपातळीवर संशोधन केले जात असताना दुसरीकडे पुतिन यांनी रशियन शास्त्रज्ञांना त्यांचे सर्व संशोधन त्वरित सरकारकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पेशी खराब होण्यापासून रोखण्याचे नवीन तंत्रज्ञान, मेंदू आणि ज्ञानेंद्रियांची कमजोरी रोखण्याचे उपाय, रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्याच्या पद्धती आणि बायोप्रिंटिंग सारख्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचे प्रस्ताव यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
Russian scientists 'are developing the world's first drug to delay ageing' months after Putin discussed 'living to 150' https://t.co/c5MQ2IhDVi
— Daily Mail (@DailyMail) April 24, 2026
नॅशनल मिशनची सुरूवात
रशियात एक ‘नॅशनल मिशन’ सुरू करण्यात आले असून, 2030 पर्यंत 1.75 लाख लोकांचे प्राण वाचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पुतिन यांची मोठी मुलगी मारिया वोरोन्त्सोवा, जी स्वतः एक एंडोक्रिनोलॉजिस्ट आहे ती देखील या संशोधनात सामील असल्याचे सांगितलं जातंय.
सत्तेचे समीकरण आणि वारसाहक्काची तयारी
पुतिन यांच्या या धडपडीमागे केवळ वैयक्तिक इच्छा नसून राजकीय गणितही असल्याचे बोलले जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, पुतिन यांना किमान 2050 पर्यंत सक्रिय राहायचे आहे. तोपर्यंत त्यांचा धाकटा मुलगा इवान जो सध्या 11 वर्षांचा आहे. 2050 मध्ये तो 35 वर्षांचा होईल, जी रशियात राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा आहे. त्यामुळे आपला वारसदार तयार होईपर्यंत स्वतःला तरुण आणि फिट ठेवण्यासाठी पुतिन या औषधाचा आधार घेत असल्याचे मानले जाते.
🇷🇺💉 🇷🇺💉 Russia developing eternal youth vax
Russian scientists are working on world’s first anti-aging vaccine.
The novel therapy aims to target the RAGE receptor, whose activation launches the aging of a cell.
Blocking this gene can prolong youth, Denis Sekirinsky,… pic.twitter.com/Z03Ypsn0nv
— Sputnik (@SputnikInt) April 25, 2026
अँटी-एजिंग गुरूचा मृत्यू: एक मोठा धक्का
गेल्या वर्षी पुतिन यांना मोठा धक्का बसला, जेव्हा त्यांचे दीर्घकाळाचे ‘अँटी-एजिंग’ गुरू प्राध्यापक व्लादिमीर खाविन्सन यांचा वयाच्या 77 व्या वर्षी अचानक मृत्यू झाला. खाविन्सन यांनी दावा केला होता की, ते माणसाला 110 ते 120 वर्षांपर्यंत जगण्याचे गुपित सांगत होते. एवढेच नव्हे तर, त्यांनी पुतिन यांचे वर्णन जुन्या तीन सोव्हिएत नेत्यांपेक्षा ‘सर्वोत्तम’ असे केले होते. एवढेच नव्हे तर, असेदेखील सांगितले जाते की, पुतिन आणि त्यांची प्रेयसी अलिना काबाएवा हे दोघेही खाविन्सन यांनी तयार केलेले ‘अँटी-एजिंग कॉकटेल’ घेत आहेत. हे औषध सोव्हिएत लष्कराच्या काळापासून विकसित करण्यात आले होते.
छोट्याशा उंदारला घाबरले अन्; पावरफुल पुतिन यांच्या कधीच जगासमोर न आलेल्या गोष्टी वाचल्या का?
काय आहे हे ‘मॅजिक’ औषध?
आता नेमकं हे औषध काय आहे तर, रशियन शास्त्रज्ञ सध्या अशा एका क्रांतिकारक ‘जीन थेरपी’वर काम करत आहेत, ज्यामुळे मानवी शरीराचे वय वाढण्याची प्रक्रिया थांबवता येईल. या संशोधनामुळे माणूस केवळ शंभर नाही, तर चक्क 150 वर्षांपर्यंत जगू शकेल, असा खळबळजनक दावा केला जात आहे. हे औषध शरीरातील ‘RAGE’ (Receptor for Advanced Glycation Endproducts) नावाच्या जनुकाला (Gene) ब्लॉक करण्याचे काम करेल. RAGE जनुकाचे कार्य हे जनुक मानवी पेशींमध्ये वृद्धत्वाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी जबाबदार असते अशी माहिती रशियाचे विज्ञान आणि शिक्षण मंत्री डेनिस सेकिरिंस्की यांनी दिली आहे. त्यामुळे जर जनुक सक्रिय होण्यापासून रोखण्यास यश आले, तर पेशी दीर्घकाळ तरुण राहू शकतात. आता विज्ञानाच्या जोरावर निसर्गाच्या चक्राला आव्हान देणारा रशियाचा हा प्रयोग यशस्वी होणार का? आणि जर झाला, तर हे औषध केवळ श्रीमंतांसाठीच मर्यादित राहणार का? याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती प्रकाशित वृत्तांवर आधारित असून, लेट्सअप मराठी याबाबत कोणताही दावा करत नाही.)
