UNGAमध्ये जयशंकरांचा पाकिस्तानला थेट इशारा; ‘दहशतवादाविरोधात झीरो टॉलरन्स’ कायम

S Jaishankar Slams Pakistan at UNGA; संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरांनी दहशतवादावर भारताची भूमिका स्पष्ट केली.

S Jaishankar Slams Pakistan at UNGA

S Jaishankar Slams Pakistan at UNGA

S Jaishankar Slams Pakistan at UNGA: संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. दहशतवादाबाबत भारताच्या धोरणात कोणतीही तडजोड केली जाणार नसून, देशाच्या सुरक्षेसाठी स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार भारत वापरत राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. जयशंकर यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तानवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

महाराष्ट्रात दुष्काळ, तर गडचिरोलीत पुराचा तडाखा; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला

जयशंकर म्हणाले की, दहशतवादाला सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या एका देशाने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर वस्तुस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दहशतवादाला सामान्य मानण्याचा किंवा त्याच्या परिणामांपासून सुटका मिळवण्याचा कोणताही युक्तिवाद स्वीकारला जाणार नाही. दहशतवादाविरोधात भारत आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलत राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘मैत्री आणि दहशतवाद एकाच वेळी पुढे जाऊ शकत नाहीत’, असं सांगत जयशंकर यांनी दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांनी आपली भूमिका बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं. दहशतवाद हा शांततेसमोरील मोठा अडथळा असून, अशा कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांना त्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

परराज्यातील टोळीने कृषी सेवा केंद्रही सोडले नाही; काही तासांत टोळी गजाआड

शहबाज शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला

जयशंकर यांच्या भाषणाच्या एक दिवस आधी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केलं. आपल्या 23 मिनिटांच्या भाषणात त्यांनी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला. या संघर्षाच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या हस्तक्षेपाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. त्याचबरोबर काश्मीरचा मुद्दाही त्यांनी पुन्हा उपस्थित केला. दक्षिण आशियात 2025 सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये आणि काश्मीर प्रश्नावर न्याय्य तोडगा निघावा, अशी मागणी शरीफ यांनी केली.

‘फक्त युद्ध थांबणं म्हणजे शांतता नाही’

जयशंकर यांनी आपल्या भाषणात पश्चिम आशियातील संघर्ष आणि वाढत्या हिंसाचाराबाबतही चिंता व्यक्त केली. या भागात दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यासाठी ‘टू-स्टेट सॉल्यूशन’ हा महत्त्वाचा मार्ग असल्याचं त्यांनी सांगितलं. परिस्थिती सुधारण्यासाठी भारत आपल्या परीने शक्य ते सहकार्य करण्यास तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

SIR प्रक्रियेत मोठा दिलासा! नोटीस मिळालेल्यांच्या घरीच BLO जाणार; निवडणूक आयोगाचा निर्णय

पॅलेस्टिनी नागरिकांसाठी भारताकडून मानवतावादी मदत आणि इतर सहाय्य सुरू असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. त्यांच्या मते, केवळ युद्ध थांबणं म्हणजे शांतता नव्हे; जगातील अनेक भाग आजही असुरक्षितता आणि दबावाच्या वातावरणातून जात आहेत. त्यामुळे शांततेसाठी पोषक वातावरण निर्माण करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

Exit mobile version