अमेरिकेत एआयबद्दल एक मोठा वाद निर्माण झाला आहे. (AI) ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी स्वतः सोशल मीडियावर मत नोंदवलं आहे. ज्यामध्ये त्यांच्या कंपनीने अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी केलेल्या कराराचा उद्देश आणि मर्यादा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
टेकक्रंचच्या अहवालानुसार, अमेरिकेत एकाच दिवसात चॅटजीपीटी अॅप अनइंस्टॉल करण्याचं प्रमाण जवळपास २९५ टक्क्यांनी वाढलं आहे. हा मुद्दा केवळ कराराचा नाही, तो आता थेट एआय, युद्ध आणि नागरी हक्कांशी जोडला गेगेला आहे.
AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला? रोहित पवारांनी एक चूक दाखवली
प्रकरण काय आहे?
सॅम ऑल्टमन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की ओपनएआयने संरक्षण विभागासोबतच्या करारात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की हे कंपनीच्या एआय सिस्टीमचा वापर अमेरिकन नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी आहे.
त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की, एआयचा वापर कायद्याच्या कक्षेत केला जाईल आणि देशांतर्गत कुठही जाणूनबुजून वेगळ्या प्रकारे वापरला जाणार नाही. ऑल्टमन यांनी असंही म्हटलं की जर सरकारकडून कोणतेही असंवैधानिक आदेश आले तर ते त्यांचे पालन करणार नाहीत.
