यल्लमा देवीच्या भाविकांचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

बेळगाव : जिल्ह्यातील सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झालाय. रामदुर्ग तालुक्याच्या चिंचनूर गावाजवळ बुधवारी मध्यरात्री हा अपघात झालाय. अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. देवीच्या दर्शनासाठी पिकअप वाहनातून हे भाविक प्रवास करत होते. नागमोडी रस्त्यामुळं ताबा सुटून वाहन […]

Untitled Design (16)

Untitled Design (16)

बेळगाव : जिल्ह्यातील सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झालाय. रामदुर्ग तालुक्याच्या चिंचनूर गावाजवळ बुधवारी मध्यरात्री हा अपघात झालाय. अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

देवीच्या दर्शनासाठी पिकअप वाहनातून हे भाविक प्रवास करत होते. नागमोडी रस्त्यामुळं ताबा सुटून वाहन वडाच्या झाडाला जाऊन आदळल्यानं हा अपघात घडल्याचं सांगण्यात आलंय. अपघातातील मृत भाविक हे रामदुर्ग तालुक्यातील हुल कंद गावाचे रहिवासी होते. हनुमाव्वा (वय 25 वर्षे), दीपा (वय 31 वर्षे), सविता (वय 17 वर्षे), सुप्रीता (वय 11 वर्षे), मारुती (वय 42 वर्षे), इंदिरव्वा (वय 24 वर्षे) अशी मृतांची नावं आहेत.

सौंदत्ती हुल कुंद गावातून दर्शनासाठी यल्लम्मा देवीच्या मंदिराकडं जाताना ही घटना घडलीय. अपघातग्रस्त गाडीतून 23 जण प्रवास करत होते. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एकाची रुग्णालयात उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवलीय. अपघातानंतर पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलीय.

Exit mobile version