Gun Fire In USA : अमेरिकेत पुन्हा गोळीबार, 24 तासांत दोन घटना, 9 जणांचा मृत्यू

कॅलिफोर्निया : जागतिक महासत्ता अमेरिकेसाठी (America) बंदूक संस्कृती (Gun Culture) डोकेदुखी ठरतेय. काही दिवसांपासून कायम अमेरिकेतून गोळीबाराच्या (Firing in America) घटना समोर येत आहेत. कॅलिफोर्नियात (California) सोमवारी झालेल्या गोळीबारात एकूण 9 जणांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या घटनेमधील संशयिताला ताब्यात घेतलंय. सॅन मेंटो येथील पोलीस मुख्यालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, सॅन फ्रान्सिस्कोच्या (San Francisco) दक्षिणेस 30 मैल […]

Untitled Design (3)

Untitled Design (3)

कॅलिफोर्निया : जागतिक महासत्ता अमेरिकेसाठी (America) बंदूक संस्कृती (Gun Culture) डोकेदुखी ठरतेय. काही दिवसांपासून कायम अमेरिकेतून गोळीबाराच्या (Firing in America) घटना समोर येत आहेत. कॅलिफोर्नियात (California) सोमवारी झालेल्या गोळीबारात एकूण 9 जणांचा मृत्यू झालाय.
YouTube video player
पोलिसांनी या घटनेमधील संशयिताला ताब्यात घेतलंय. सॅन मेंटो येथील पोलीस मुख्यालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, सॅन फ्रान्सिस्कोच्या (San Francisco) दक्षिणेस 30 मैल अंतरावर हाफ मून बेजवळील एका महामार्गावर गोळीबाराची घटना घडली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमेरिकेत गोळीबाराच्या दोन घटना घडल्यात. अमेरिकेच्या आयोवा येथील डेस मोयनेस शहरातील एका शाळेतील गोळीबारात दोन विद्यार्थी मृत्यूमुखी पडले, तर एक शिक्षक गंभीर जखमी झाले.

कॅलिफोर्नियात दोन दिवसांमधील ही तिसरी घटना आहे. त्यात चौघांचा मृत्यू झालाय. यापूर्वी 22 जानेवारीला कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमधील मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला. या गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत.

अमेरिकेसाठी बंदूक संस्कृती मोठी समस्या बनलीय. 2021 या वर्षामध्ये जवळपास 49 हजार लोकांनी गोळीबारात आपला जीव गमावलाय. त्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक लोकांनी आत्महत्या केलीय. देशात लोकसंख्येपेक्षा जास्त शस्त्रं असल्याची माहिती आहे. तीनपैकी एका व्यक्तीकडं किमान एक बंदूक आणि दोनपैकी एकाकडं बंदूक असलेल्या घरात राहतो.

Exit mobile version