Sweden Firing : मोठी बातमी! स्वीडनमधील शाळेत गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

Sweden Firing :  मध्य स्वीडिश (Sweden) शहरातील ओरेब्रो येथील एका शाळेत गोळीबार (Sweden Firing) झाल्याची माहिती समोर आली आहे.

Sweden Firing

Sweden Firing

Sweden Firing :  मध्य स्वीडिश (Sweden) शहरातील ओरेब्रो येथील एका शाळेत गोळीबार (Sweden Firing) झाल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका, बचाव सेवा आणि पोलिस दाखल झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकरणाचा तपास हत्येचा प्रयत्न, जाळपोळ आणि गंभीर शस्त्र गुन्हा म्हणून केला जात आहे. गोळीबारानंतर शाळेतील इतर भाग रिकामे करण्यात आले तर विद्यार्थ्यांना जवळच्या इमारतींमध्ये आश्रयासाठी हलवण्यात आले. तर सरकार कायदा अंमलबजावणी संस्थांशी जवळून संपर्कात आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. असं  न्यायमंत्री गुन्नार स्ट्रॉमर (Justice Minister Gunnar Strömer) यांनी स्वीडिश वृत्तसंस्था टीटीला सांगितले.

माहितीनुसार, ही घटना बहुतेक विद्यार्थी शाळेत उपस्थित असताना घडली आहे. मात्र या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाले आहे का आणि हल्ल्यामागील कारण काय आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.  तपास आणि सुरक्षा कार्यात अडथळा येऊ नये म्हणून स्थानिक लोकांना शाळेजवळ जाऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मोघम आरोप, अंजली दमानिया यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार; धनंजय मुंडे

Exit mobile version