प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र या सरकरकडून २५ जानेवारीला पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2023 )घोषणा केली. विविध क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल अनेक व्यक्तींना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. यंदाच्या वर्षी डॉ. एस. एल भैरप्पा (S. L. Bhyrappa) हे देखील पद्मभूषण विजेत्यांपैकी एक आहेत. भैरप्पा हे कन्नड साहित्यकार असून त्यांच्या अनेक कादंबऱ्या भारतीय भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुवादित झाल्या आहेत. पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाल्यांनतर एस एल भैरप्पा म्हणाले की जर एखाद्या लेखकाच्या कार्याला त्याच्या मृत्यूनंतरही प्रासंगिकता असेल तर ते खूप मोठे पुरस्कार आहे.
यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना भैरप्पा म्हणाले की, नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान असल्याने मला हा पुरस्कार मिळाला आहे. ते पुढे म्हणाले की, पुरस्कार येतात आणि जातात, लेखकाला कोणता पुरस्कार मिळाला हे कोणी पाहणार नाही, वाचकांना लेखकाच्या पुस्तकात रस असेल तर त्यांना ते आवडेल. लेखक एक दिवस मरेल पण त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या पुस्तकाची प्रासंगिकता टिकून राहील का हे जास्त महत्त्वाचे आहे.
भैरप्पा हे एक प्रसिद्ध कन्नड लेखक आहेत ज्यांची पुस्तके 14 हून अधिक भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. भारतीय महाकाव्यांमध्ये समाज आणि मूल्यांबद्दल लिहिण्यात त्यांना नैपुण्य आहे. त्यांच्या विविध कादंबऱ्यांपैकी ‘आवरण’ ही सर्वाधिक लोकप्रिय कादंबरी आहे. या सन्मानाने आनंदित भैरप्पा म्हणाले, “हा पुरस्कार म्हैसूरच्या लोकांना समर्पित आहे, कारण माझे गुरू आणि येथील लोकांनी मला टिकवले आहे.”