Download App

पक्षी, लँडिंग गियर अन् ब्लास्ट.. दक्षिण कोरियात कसा झाला विमान अपघात; जाणून घ्या डिटेल..

दक्षिण कोरियाची न्यूज एजन्सी योनहापच्या रिपोर्टनुसार विमानाला एका पक्ष्याची धडक बसल्याने विमानाच्या लँडिंग गिअरवर परिणाम झाला असावा.

South Korea Plane Crash : दक्षिण कोरियात एक प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त (South Korea Plane Crash) झाले. विमानतळावर लँडिंग करत असतानाच रनवे वरून घसरून विमानाने पेट घेतला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. सुरुवातील 28 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु,आताच हाती आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत तब्बल 179 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा अपघात कोणत्या कारणामुळे घडला याची माहिती मिळाली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की जेजे एअर कंपनीचे विमान मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असतानाच रनवे वरून घसरले आणि दुर्घटना ग्रस्त झाले.

दुर्घटनाग्रस्त विमान जेजू एअरचे बोइंग 737-800 प्रकारातील होते. या विमानात एकूण 175 प्रवासी आणि 6 फ्लाइट अटेंडेंट होते आणि हे विमान थायलंडहून माघारी परतले होते. परंतु, विमानतळावर उतरत असतानाच अपघात झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

मोठी बातमी! दक्षिण कोरियात विमान क्रॅश, 62 प्रवाशांचा मृत्यू; Video व्हायरल

लँडिंग करतानाच झाला अपघात

दक्षिण कोरियाची न्यूज एजन्सी योनहापच्या रिपोर्टनुसार विमानाला एका पक्ष्याची धडक बसल्याने विमानाच्या लँडिंग गिअरवर परिणाम झाला असावा. याच कारणामुळे लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे आग लागली. पायलटने लँडिंग गिअर फेल झाल्यानंतर विमानाला सरळपणे खाली उतरवण्याचा निर्णय घेतला. इमर्जन्सी लँडिगच्या वेळी विमानाचा वेग कमी होऊ शकला नाही आणि विमान रनवेच्या शेवटच्या टप्प्यात जाऊन पोहोचले. विमानतळाच्या शेवटी असणाऱ्या एका कुंपणाला जाऊन धडकले.

नंतर विमानाला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, 175 प्रवाशांपैकी 173 कोरियन नागरिक होते. तर दोन प्रवासी थायलंडचे नागरिक होते. या विमान अपघातानंतर देशात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकीय आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून बऱ्याचे वेळेपासून मदतकार्य़ सुरू आहे. विमानातून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. या अपघातात आतापर्यंत दोघा जणांना जिवंत वाचविण्यात यश मिळालं आहे.

follow us