Donald Trump : अमेरिकेने भारताला मोठा धक्का दिला आहे. आता रशियाकडून येणाऱ्या काही वस्तू महागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून कच्चा तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांना टार्गेट करणाऱ्यासाठी एक विशेष विधेयक सिनेटमध्ये मंजूर करुन घेतला आहे. त्यामुळे आता अमेरिकेला आयातीवर 100 टक्के टॅरिफ आकाराण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये 86-11 अशा मतांनी मंजूर झाले असून, आता ते ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’कडे (अमेरिकन काँग्रेसचे कनिष्ठ सभागृह) पाठवले जाईल. तिथे मंजूर झाल्यानंतर ते मंजुरीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे जाईल आणि त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
भारताव्यतिरिक्त या 4 देशांवरही लागू होणार शुल्क
100 टक्के टॅरिफ आकारण्याचा प्रस्ताव असलेले हे विधेयक रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट अशा दोन्ही पक्षांच्या पाठिंब्याने सिनेटमध्ये मांडण्यात आले होते. जर हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाले, तर ट्रम्प प्रशासनाला भारत, चीन, स्लोव्हाकिया, अझरबैजान आणि हंगेरी या देशांवर 100 टक्के टॅरिफ आकारण्याचा अधिकार मिळेल.
23 जुलै रोजी जेव्हा हे विधेयक पहिल्यांदा मांडले गेले, तेव्हा त्यात 500 टक्के शुल्काचा प्रस्ताव होता परंतु विरोधानंतर ते प्रमाण 100 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. तेल आणि वायू व्यापारातून रशियाला मिळणारे उत्पन्न कमी करणे आणि त्याद्वारे त्यांची युद्धक्षमता कमकुवत करणे, हा या विधेयकाचा उद्देश आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडून कच्चा तेल आयात करत आहे. जून महिन्यात भारताने रशियाकडून दररोज 2.61 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली, जी भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी 52.4 टक्के होती. गेल्या महिन्यात भारतात आयात केलेल्या प्रत्येक दोन बॅरल तेलापैकी एकापेक्षा जास्त बॅरल तेल रशियातून आले होते. रशियन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार म्हणून भारताचे स्थान कायम आहे. मात्र, जर अमेरिकेने भारतावर 100 टक्के शुल्क लादले, तर कच्च्या तेलाचा खर्च वाढेल आणि त्यामुळे भारतात त्यापासून तयार होणाऱ्या सर्व उत्पादनांच्या किमतीही वाढतील. पेट्रोल, डिझेल आणि विविध प्रकारचे वायू (एलएनजी, सीएनजी, पीएनजी, एलपीजी) यांसारख्या वस्तूंच्या किमती वाढतील, ज्यामुळे भारतीय ग्राहकांवर आर्थिक बोजा पडेल.
The Senate overwhelmingly approved a punishing Russian sanctions package Friday, the result of a year-long campaign by the late Sen. Lindsey Graham to reinforce U.S. support for Ukraine and try to force President Vladimir Putin’s hand as the grinding war drags on: US media
The…
— ANI (@ANI) August 7, 2026
भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार
कच्च्या तेलाव्यतिरिक्त भारत आणि रशिया यांच्यात संरक्षण सामग्री, खते, कोळसा, खनिजे, मौल्यवान खडे आणि वनस्पती तेले यांचा व्यापार होतो. भारत आपल्या सशस्त्र दलांसाठी रशियाकडून शस्त्रे, क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने आणि सुटे भाग (स्पेअर पार्ट्स) खरेदी करतो. कृषी क्षेत्रासाठी आवश्यक असलेली रासायनिक खते आणि सेंद्रिय खते देखील रशियाकडूनच मिळवली जातात. याव्यतिरिक्त, भारत आपल्या औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रांसाठी रशियाकडून ‘कोकिंग कोल’ (coking coal) आणि इतर घन इंधनांची आयात करत आहे. भारत रशियाकडून हिरे, मोती आणि रत्ने यांसारखे मौल्यवान खडे व धातू, तसेच सूर्यफूल तेल आणि इतर खाद्यतेलांचीही आयात करतो. या दोन देशांमधील द्विपक्षीय व्यापार अब्जावधी डॉलर्सचा आहे आणि भारत हा रशियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.
