Download App

गृहयुद्धांचा सुदान ! 68 वर्षांत गेला 28 लाख लोकांचा बळी; जाणून घ्या, युद्धांचा इतिहास

Sudan Clashes : सुदानमध्ये लष्कर आणि अर्धसैनिक दलामध्ये अजूनही संघर्ष (Sudan Clashes) सुरू आहे. सध्या काही काळासााठी युद्ध विरामाचा कालावधी 72 तासांसाठी आणखी वाढविण्यास दोन्ही दल सहमत झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या संघर्षात आतापर्यंत 512 लोकांचा बळी गेला आहे तर 4 हजार 193 लोक जखमी झाले आहेत. या देशाला गृहयुद्ध किंवा संघर्ष काही नवा नाही. 1956 मध्ये ब्रिटेन आणि इजिप्त पासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुदान अनेक गृहयुद्धांना सामोरा गेला आहे.

हे संघर्ष होते तरी कोणते याची माहिती जाणून घेऊ या..

1955-1972 गृहयुद्धातच मिळाले स्वातंत्र्य

सुदान 1 जानेवारी 1956 रोजी स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळण्याआधीच येथे संघर्ष सुरू झाला होता. हा संघर्ष उत्तर आणि दक्षिण भागात सुरू होता जो 1972 पर्यंत चालला. 17 वर्षांचा हा रक्तरंजित संघर्ष शेजारी देश इथिओपियात एका करारानुसार संपला. ज्यानुसार दक्षिण भागाला स्वायत्तता देण्यात आली.

11 वर्षांनंतर 1983 मध्ये पुन्हा सुदानमध्ये गृहयुद्धाचा भडका उडाला. त्यावेळचे राष्ट्रपती जाफर निमिरी यांनी दक्षिणेची स्वायत्तता रद्द करणे, शरिया कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला. निमिरी म्हणाले, की दक्षिणी सैनिक विद्रोह करायला लागले होते. पहिल्या संघर्षात जवळपास पाच लाख लोक मारले गेले होते.

Operation Kaveri : सुदानमधील 360 भारतीय दिल्लीत सुखरुप दाखल, परराष्ट्र मंत्रालायाची माहिती

1983-2005 : दुसरे गृहयुद्ध

सुदानमधलील दुसरे गृहयुद्ध 1983 मध्ये त्यावेळी सुरू झाले ज्यावेळी जॉन गारंग यांच्या नेतृत्वात सुदान पीपुल्स लिबरेशन मूव्हमेंटच्या सैनिकांनी विद्रोह केला. त्यानंतर 1989 मध्ये देशात सत्तापालट होते. अमर अल बशीर सत्तेत येतात. त्यानंतर त्यांनी या विद्रोहावर नियंत्रण मिळवले.

उत्तर भागातील विद्रोह करणाऱ्यांनी पूर्वी सुदान, ब्लू नाइल, आणि नूबा पर्वताच्या क्षेत्रात सरकारविरोधात मोर्चा उघडला. या बावीस वर्षांच्या युद्धात तब्बल 20 लाख लोकांचा बळी गेला. तर 40 लाख लोक विस्थापित झाले. हे युद्ध 9 जानेवारी 2005 रोजी संपले.

2003-2020 : दारफूर युद्ध

सुदानमधील पश्चिमी भाग दारफुर नावाने ओळखला जातो. हा प्रदेश 2003 पासून युद्धाच्या संकटात ढकलला गेला. येथील लोकांनी सरकारविरोधात आंदोलन सुरू केले. युद्धाच्या पहिल्या पाच वर्षात युद्ध आणि रोगराई , कुपोषण या कारणांमुळे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला. तर 25 लाख लोक विस्थापित झाले.

2009 आणि 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालयाने दारफूर मध्ये केलेल्या नरसंहाराला जबाबदार धरत राष्ट्रपती बशीर यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले. बशीर यांना 2019 मध्ये सत्तेतून बेदखल करण्यात आले.

ऑपरेशन कावेरी ! सुदानमध्ये अडकलेल्या 278 भारतीयांची पहिली तुकडी जेद्दाहला रवाना

2023 : सेना आणि अर्धसैनिक दलात संघर्ष

सुदानमध्ये सेना आणि अर्धसैनिक दलात मागील 15 एप्रिलपासून हिंसक घटना सुरू आहेत. राजधानी खारतूमसह देशातील अनेक शहरांत विस्फोट आणि गोळीबाराच्या घटना घडत आहेत. विदेशी राजनयिकांवरही हल्ले केले आहेत. दोन्ही दल एकमेकांवर आरोप करत आहेत. या लढाईत आतापर्यंत 500 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. तर 4 हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

युद्धाचे कारण काय ?

या हिंसक घटनांचे मूळ तीन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तापालटात आहे. एप्रिल 2019 मध्ये एका विद्रोहादरम्यान सैन्य अधिकाऱ्यांनी उमर अल बशीर यांनी सत्तेतून बेदखल केले. तेव्हापासून सेना एक संप्रभू परिषदेच्या माध्यमातून देश चालवत आहे. सुदानच्या सेनेचे असे म्हणणे आहे की आरएसएफ, अर्धसैनिक दलांतर्गत येते आणि त्याला सेनेत समाविष्ट करून घेऊ नये.

Tags

follow us