Download App

तेजप्रतापचा लालूंच्या डोक्याला मोठा ताप ! एका पक्षाबरोबर आघाडी करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले !

Bihar Assembly Electionआरजेडीमधून हकालपट्टी करण्यात आलेले लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव (TejPratap) यांनी एक मोठी राजकीय खेळी खेळलीय.

  • Written By: Last Updated:

Bihar Assembly Election: येत्या काही महिन्यात बिहार विधानसभा (Bihar Assembly Election)निवडणूक होणार आहे. त्यामुळे बिहारचे राजकारण तापले आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए मजबूत आहे. नितीश कुमार (Nitiesh kumar) यांना माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री राहिलेले लालूप्रसाद यादव (Lalu Yadhav) यांचा आरजेडी (RJD) (राष्ट्रीय जनता दल) लढत देईल, असे वाटत आहे. आरजेडीमधून हकालपट्टी करण्यात आलेले लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव (TejPratap) यांनी एक मोठी राजकीय खेळी खेळलीय.

“https://letsupp.com/maharashtra/st-corporation-use-yatri-app-pratap-sarnaik-big-announcement-255987.html”>राज्य सरकार चालवणार ‘छावा राईड’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

तेजप्रताप यांनी व्हीव्हीआयपी (VVIP)या पक्षाशी आघाडी केल्याचे घोषित केले आहे. विधानसभेच्या सर्व जागांवर ही आघाडी असणार आहे. काही महिन्यांपूर्वी तेजप्रताप यांनी प्रियसी अनुष्काबरोबर असलेले नाते जाहीर केले होते. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल केले होते. माजी आरोग्यमंत्री राहिलेले तेजप्रताप यांचे एेश्वर्या नावाच्या मुलीशी लग्न झालेले आहे. परंतु कायदेशीररित्या दोघे वेगळे झालेले नाहीत. तेजप्रताप यांच्या या प्रकरणामुळे विरोधकांनी लालू प्रसाद यादव यांना घेरले होते. त्यामुळे लालू यादव यांनी तेज प्रताप यांना पक्षातून काढले. तसेच कौटुंबिक संबंध ठेवले नाहीत.

भयंकर! हजारो तरूण आंधळे होत आहेत; डोळ्यांवर ‘कॉर्नियल ब्लाइंडनेस’चं संकट, तज्ज्ञांचा इशारा

त्यानंतर तेजप्रताप यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची जाहीर केले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा राष्ट्रीय जनता दलाने पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. तर काँग्रेसने त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु तेज प्रताप यांनी नकार देत मी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु आता त्यांनी एका स्थानिक पक्षाशी आघाडी केल्याचे जाहीर केले आहे. आम्ही यादव आणि मुस्लिम समाजाला एकत्र घेऊन चालणार असल्याचे तेजप्रताप यांनी म्हटले आहे. उलट त्यांनी आरजेडीला या आघाडीत येण्याचे आवाहन केले आहे. तेज प्रताप यांच्या राजकीय चालीमुळे आरजेडीला फटका बसू शकतो. कारण आरजेडीला मानणारा वर्ग हा यादव व मुस्लिम आहे. त्यामुळे मुलाच लालूप्रसाद यादवांच्या नाकात दम आणणार असे सध्या दिसत आहे.


व्हीव्हीआयपी पक्ष कुणाचा ?

व्हीव्हीआयपी पक्ष प्रदीप निषाद यांचा आहे. व्हीआयपीचे प्रमुख मुकेश सहनी यांच्याबरोबर वाद झाल्यानंतर प्रदीप निषाद हे पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी व्हीव्हीआयपी नावाने नवीन पक्ष काढला आहे. बिहारची विधानसभा निवडणुकीसाठी अनेक छोट्या पक्षांनी तयारी केलीय. राजकीय रणनिती आखणारे प्रशांत किशोर, माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचे पक्ष निवडणुकीत रिंगणात उतरणार आहे. अनेक छोटे पक्ष निवडणुकीत उतरणार असल्याने इंडिया आघाडीचे मते कमी होऊ शकतात. तर सत्ताधारी भाजप, जेडीयूला फायदा होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

follow us