Dog Walking Job : एक इंजिनिअर आपली नोकरी सांभाळून रस्त्यावर कुत्र्यांना फिरायला घेऊन जाण्याचा बिझनेस (Dog Walking Job ) करुन महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे न्यूयॉर्कमध्ये घडलंय. कोबी गुडहार्ट असं या इंजिनिअरचं नाव असून नोकरी सांभाळून कसा बिझनेस केला जातो? हे कोबी यांनी सिद्ध करुन दाखवलंय. या पार्ट-टाईम बिझनेसमधून कोबी गुडहार्ट महिन्याला जवळपास 5.72 लाख रुपये ($6,000) कमवत आहे. एक इंजिनिअर नोकरी सांभाळत पार्ट-टाईममध्ये व्यवसाय करुन लाखो रुपये कमवत आहे, हे एकून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
कोबी गुडहार्टच्या डोक्यात ही आयडिया कशी आली?
कोबी गुडहार्ट 2023 साली न्युयॉर्क शहरात शिफ्ट झाले. त्यांना प्राण्यांविषयी विशेष प्रेम आहे. न्यूयॉर्कसारख्या रेलचेल असणाऱ्या शहरात लोकं आपल्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे श्रीमंत लोकं आपल्या पाळीव कुत्र्याला वेळ देऊ शकत नाहीत. अर्थात पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन जाऊ शकत नाही. कोबीने हीच गोष्ट ओळखून घेत नवा व्यवसाय शोधून काढलायं. कोबी यांनी 2025 साली ‘गुडहार्ट डॉग कंपनी’ सुरु केली. या कंपनीच्या माध्यमातून ते पाळीव कुत्र्यांना सेवा देत आहेत.
एकीकडे नोकरी तर दुसरीकडे व्यवसाय…
कोबी गुडहार्ट एका कंपनीत पूर्णवेळ इंजिनिअर आहेत. आपल्या नोकरीच्या वेळेप्रमाणे त्यांनी आपलं शेड्यूल ठरवलंय. कोबी आपल्या दिवसाची सुरुवात पहाटे उठून करता. त्यानंतर दुपारी जेवणाच्या वेळेत ते काही ग्राहकांच्या पाळीव कुत्र्यांना फिरण्यास घेऊन जातात. त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान ऑफिस सुटल्यानंतर आणि वीकेंडला मोठ्या प्रमाणात काम सुरु असतं.
कंपनीच्या सुरुवातील काम कमी प्रमाणात होतं. त्यानंतर हळूहळू कामाचा व्याप वाढल्यानंतर कोबी यांनी आपली टीम बनवली. त्यांनी आपल्यासोबत एक डॉग वॉकरही ठेवला आहे. त्याला त्यांनी स्वत: ट्रेनिंग दिलीयं. कोबी आपल्या नोकरीच्या कामात व्यस्त असल्यास त्याचा डॉग वॉकर कुत्र्यांना फिरायला घेऊन जातो. कोबी आणि त्यांची टीम मिळून दिवसभरात 10 ते 20 कुत्र्यांना फिरायला घेऊन जाण्याचं काम करते.
दरम्यान, तुम्ही जेव्हा चांगलं काम करीत असतात, तेव्हा तुमची मार्केटिंग चांगली होत असते. आपण चांगलं काम केल्यास त्याची चर्चा इतर लोकं असतात. कुत्र्यांना फिरायला घेऊन गेल्यानंतर इमारतींच्या सुरक्षा रक्षकांना कोबी आपल्या व्यवसायाचं कार्ड देत असतात. सुरक्षा रक्षकाला इमारतीमधील लोकांच्या समस्या माहित असतात. त्यामुळे कोबीला ग्राहक मिळत असतात.
