Download App

Tharman Shanmugarratnam : सिंगापूरमध्ये भारतीय वंशांचे राष्ट्राध्यक्ष, थर्मन षण्मुगररत्नम यांनी घेतली शपथ

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे अर्थतज्ञ थर्मन षण्मुगररत्नम (Tharman Shanmugarratnam) यांनी सिंगापूरच्या (Singapore) अध्यक्षीय निवडणुकीत प्रंचड बुहमताने विजय मिळवला होता. त्यांनंतर त्यांनी सिंगापूरचे नववे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, दोन आठवडे सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेनंतर त्यांनी प्रचंड विजय मिळवला. थरमन षण्मुगरत्नम (वय ६६) यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी पार पडला. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला.

नुकत्याच झालेल्या निवडणुकातं थर्मन षण्मुगरत्नम यांनी त्याने दोन चिनी प्रतिस्पर्ध्यांचा दारून पराभव केला आहे. सिंगापूर निवडणूक विभागानुसार, थर्मन यांना 70.4% मते मिळाली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी एनजी कोक संग यांना 15.72% आणि टॅन किन लियान यांना 13.88% मते मिळाली. थर्मन यांना दोन्ही मतांपेक्षा दुप्पट मते मिळाली. थर्मन यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यांतर सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी थर्मन यांचे अभिनंदन केले आणि ते अध्यक्षपदाची जबाबदारी मोठ्या यशाने पार पाडलीत, असा विश्वास व्यक्त केला.

https://x.com/ani_digital/status/1702319511205224733?s=20

कोण आहेत थर्मन?

थर्मन यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1957 रोजी सिंगापूर येथे झाला. त्यांचे आजोबा तामिळनाडूहून स्थलांतरीत होऊन सिंगापूरमध्ये स्थायिक झाले होते. थर्मन यांचे वडील के. षण्मुगररत्नम प्रोफेसर होते. जे वैद्यकीय शास्त्रज्ञ होते. ज्यांना सिंगापूरमध्ये पॅथॉलॉजीचे जनक मानले जाते. तर थर्मन हे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि सरकारी अधिकारी होते. त्यांनी प्रामुख्याने सिंगापूरच्या चलन प्राधिकरणात काम केले आहे.

काश्मीरमध्ये यंदा घुमणार ‘गणपती बाप्पा मोरयाsss’चा आवाज; पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा पुढाकार 

त्यानंतर 2001 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2011 ते 2019 पर्यंत त्यांनी शिक्षण, अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून काम केले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि युनायटेड नेशन्स यासह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांनी प्रमुख पदे भूषवली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील थर्मन यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. भारत-सिंगापूर राजनैतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी भविष्यात थर्मन यांच्यासोबत काम करायला आवडेल, असा मानसही मोदींनी व्यक्त केला.

 

Tags

follow us