Download App

अभिमानास्पद! अमेरिकेच्या व्हाईट हाऊसबाहेर फडकला तिरंगा

Prime Minister Narendra Modi’s visit to America : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20-24 जून रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसबाहेर तिरंगा ध्वज फडकताना दिसत आहे. नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

नरेंद्र मोदी 20 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेत असतील. पंतप्रधान अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. यासोबतच अमेरिकन राजकारणी, प्रथितयश लोक आणि परदेशातील भारतीय लोकांना भेटणार आहे. 22 जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदींचे औपचारिक स्वागत होणार आहे. त्यामुळे व्हाईट हाऊसच्या दक्षिण लॉनमध्ये सराव सुरू आहे.

‘आदिपुरुष’ वादाच्या भोवऱ्यात, हिंदू सेनेची हायकोर्टात याचिका

व्हाईट हाऊसच्या बाहेर भारतीय ध्वज फडकावल्याबद्दल न्यू जर्सीमध्ये राहणारे भारतीय नागरिक जेसल नार म्हणाले की, ही सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी अमेरिकेला जाणार आहेत. ते प्रथम न्यूयॉर्कला जातील आणि 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व करतील. यानंतर पंतप्रधान वॉशिंग्टन डीसीला जातील. 22 जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदींचे औपचारिक स्वागत होणार आहे. ते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतील आणि चर्चा करतील.

आनंद महिंद्रांनी शेअर केला ‘टॉप ऑफ माउंट एव्हरेस्ट’ व्हिडिओ; पाहून थक्क व्हाल

22 जूनच्या संध्याकाळी नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि जिल बायडेन यांनी आयोजित केलेल्या शासकीय भोजनाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी नरेंद्र मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. यासाठी त्यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजचे अध्यक्ष केविन मॅककार्थी आणि सिनेटचे अध्यक्ष चार्ल्स शुमर यांच्यासह अमेरिकन काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे.

23 जून रोजी, पंतप्रधान अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्र सचिव अँटनी बिलकेन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उपस्थित राहतील. यासह ते प्रमुख सीईओ, व्यावसायिक आणि इतर भागधारकांशी संवाद साधणार आहेत. ते अनिवासी भारतीयांनाही भेटणार आहेत.

Tags

follow us