Download App

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीस पंतप्रधान मोदी अनुपस्थित राहणार?,वरिष्ठ मंत्री जाण्याची शक्यता

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण असलं तरी ते या बैठकीस अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • Written By: Last Updated:

SCO Meeting : शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीस हजर राहण्यासाठी पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं असलं तरी या बैठकीस मोदी हे उपस्थित राहण्याची शक्यता कमीच असल्याचं मानले जात आहे. (SCO Meeting) दोन्ही देशांदरम्यान असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्याऐवजी एखाद्या मंत्र्यास अथवा वरिष्ठ अधिकाऱ्याला या बैठकीस पाठविलं जाण्याची शक्यता आहे.

भीषण अपघात! पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये बस दरीत कोसळी; २६ जणांचा मृत्यू, नऊ जण जखमी

येत्या १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानात शांघाय सहकार्य संघटनेची बैठक होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या बैठकीसाठी एससीओ सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण पाठवलं आहे. यात पंतप्रधान मोदी यांचा समावेश आहे. याआधीही पाकिस्तानात झालेल्या अशा प्रकारच्या बैठकीसाठी वरिष्ठ अधिकारी तसंच मंत्र्याला पाठवण्यात आलं होतं.

Bomb Blast : पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागात बॉम्बस्फोट; बॉम्बस्फोटात दोन मुलं ठार, तर 16 जखमी

एससीओ’च्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट (सीएचजी) बैठकीसाठी भारताकडून सहसा वरिष्ठ मंत्र्याला पाठवलं जातं. गतवर्षी किर्गिझस्तानमध्ये झालेल्या बैठकीस परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हजेरी लावली होती. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश ‘एससीओ’ संघटनेचे पूर्ण सदस्य आहेत. दरम्यान, रशिया आणि चीन यांच्याकडून या संघटनेचे नेतृत्व केलं जातं. प्रादेशिक सुरक्षा आणि मध्य आशियाई देशांदरम्यानचे सहकार्य वाढवणं हा संघटनेच्या स्थाापनेमागचा उद्देश आहे. एससीओवर चीनचा प्रभाव असल्यामुळे भारत या संघटनेच्या अनुषंगाने विशेष दक्षता घेत असतो.

 

follow us