Download App

मोठी बातमी ! आयफेल टॉवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सर्च ऑपरेशन सुरू

  • Written By: Last Updated:

Eiffel Tower : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील जगप्रसिद्ध ‘आयफेल टॉवर’ला ( Eiffel Tower) बॉम्बने उडवण्याची (Bomb Threat) धमकी मिळाल्याचं वृत्त समोर येत आहे. या धमकीमुळं पर्यटकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी पर्यटकांना येथून बाहेर जाण्यास सांगितले असून संपूर्ण टॉपर रिकामा करण्यात आला आहे. (The threat of blowing up the world famous Eiffel Tower with a bomb)

याबाबत माहिती देताना पॅरिस पोलिसांनी सांगितले की, जगातील सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पॅरिसमधील आयफेल टॉवरला बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी मिळताच पोलीस प्रशासन सतर्क झाले. आणि पोलिसांनी खरदारी म्हणून सर्वात आधी आयफेल टॉवर रिकामा केला. त्यामुळे शनिवारी ते जनतेसाठी बंद ठेवण्यात आलं होतं.

पॅरिसमधील मध्यवर्ती भागात असलेल्या आयफेल टॉवरचे तीन मजले रिकामे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. पोलिसांच्या अनेक तुकड्याही घटनास्थळी तैनात आहेत. आयफेल टॉवरच्या आजूबाजूलाही बॉम्बचा शोध सुरू आहे. येथे पोलिसांनी बॅरिकेड लावले आहे. पर्यटकांना टॉवरपासून दूर राहण्यासही सांगण्यात आले आहे.

राहुल द्रविड ऐवजी आयर्लंड दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून जाणारे सितांशु कोटक कोण? 

स्थानिक पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, शनिवारी दुपारी दीड वाजता बॉम्बची धमकी मिळाली. त्यानंतर पर्यटकांना तातडीने तीनही मजले आणि टॉवरच्या खाली असलेल्या प्लाझामधून दूर राहण्यास सांगण्यात आले.

आयफेल टॉवर हे जगभरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे येथे जगभरातून हजारो पर्यटक येत असतात. या टॉपरच्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर टॉवरच्या दक्षिणेकडील खांबावर एक पोलीस ठाणे आहे. जिथे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत. संकुलात प्रवेश करण्यापूर्वी पर्यटकांना कडक सुरक्षा निगराणीतून जावे लागते.

Tags

follow us