Download App

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा Swati Maliwal यांच्यासोबतच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली – दिल्ली महिला आयोगाच्या (Delhi Commission Women) अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्यासोबत झालेल्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.व्हिडिओमध्ये एक कार चालक त्यांना विचारत आहे की तुला कुठे जायचे आहे, ज्यावर मालीवाल म्हणत आहेत की मला घरी जायचं आहे, माझे नातेवाईक येत आहेत. यानंतर आरोपी पुन्हा परत येतो आणि त्यांना घरी सोडण्याचं विचारताना दिसतोय.

YouTube video player

यावर त्याने विचारले तुम्हाला कुठं सोडू? माझे नातलग येणार आहेत हे मी तुला सांगितले.यावर दुसऱ्यांदा आलेला ड्रायव्हर मालीवाल यांना विचारतो.तुम्हाला कुठं सोडायचं? यावर त्या म्हणतात की मी तुला वारंवार सांगितले की मला कुठेही सोडायचे नाही.

स्वाती मालीवाल यांनी ट्विट केले होते की, काल रात्री उशिरा मी दिल्लीतील महिला सुरक्षेच्या स्थितीचा आढावा घेत होते. एका ड्रायव्हरने मद्यधुंद अवस्थेत माझा विनयभंग केला आणि जेव्हा मी त्याला पकडले तेव्हा त्याने माझा हात गाडीच्या आरशात बंद करून मला ओढले. देवाने जीव वाचवला. दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील, तर परिस्थितीची कल्पना करा.

दरम्यान, मालीवालने म्हटले होते की, माझी अवस्था अंजलीसारखी झाली असती, पण देवाने माझे प्राण वाचवले. मालिवाल यांना एका कार चालकाने 10-15 मीटरपर्यंत ओढून नेले. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेत असताना कार चालकाने आपला विनयभंग केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला होता.

Tags

follow us