Download App

भारताशी दोन हात करण्याची आमची कुवतच नाही; पाकच्या लष्करप्रमुखांची कबुली

  • Written By: Last Updated:

There is no ability to fight with India : श्रीलंकेक जे घडलंय, तेच आता पाकिस्तानमध्ये (Pakistan) घडत आहेत. पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आज पाकिस्तानचे दोन्ही हात रिकामे असून परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होते. सध्या परिस्थिती अशी की, महागाईने कहर केला असून लोकांच्या खायचेही वांदे झाले. सरकारी तिजोरीतही खणखणाट आहे. दरम्यान, आता पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (Qamar Javed Bajwa) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारताविरुध्द (India) लढण्यासाठी पाकिस्तानकडे (Pakistan) दारुगोळा नाही. आज दारुगोळा खरेदी कऱण्यासाठी पाकचे आर्थिक सामर्थ्यही नाही, त्यामुळं पाकिस्तानची भारताविरुध्द लढण्याची ताकत आणि क्षमता नाही, असं कबुली त्यांनी दिली.

यूकेस्थित पाकिस्तानी मीडिया ‘UK44’चे दोन ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर आणि नसीम जहरा यांच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वी कमर जावेद बाजवा आले होते. त्यावेळी घेतलेल्या मुलाखतीत त्यांना भारत- पाक यांच्यात युध्द झाल्यास काय होईल, याविषयी प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले होते की, पाकिस्तान भारताशी युद्ध करण्यास असमर्थ असल्याचे सांगितलं होतं. भारता सारख्या बलाढ्य देशाविरुध्द लढण्यासाठी जी आश्यक साधने, शस्त्रास्त्रे असायला हवीत, ती पाकिस्तानकडे नाहगीत. पाकिस्तानकडे दारुगोळा नाही. आज दारुगोळा, शस्त्रास्त्रे खरेदी कऱण्यासाठी पाकचे आर्थिक सामर्थ्यही नाही, त्यामुळं पाकिस्तानची भारताविरुध्द लढण्याची ताकत आणि क्षमता नाही, असं त्यांनी सांगितलं.
पुढच्या वज्रमूठ सभेत अजित पवारांची खुर्ची दिसणार नाही, शिंदे गटाकडून नवा दावा

मीरच्या म्हणण्यानुसार, जनरल बाजवा यांनी हे मान्य केले की पाकिस्तान भारताशी युद्ध करू शकत नाही. कमांडर्स कॉन्फरन्सदरम्यान बाजवा यांनी हेही मान्य केले होते की, पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्कराशी पाक सैन्याची लढण्याची कुवत नाही. मीर आणि झाहराने त्याच्यासमोर त्यांनी हा खुलासा केला. दरम्यान, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झााली तर सैन्याची हालचाल तसेच तोफखाना हा भारत पाक बॉन्ड्रीवर नेण्यासाठी जे इधन लागणार आहे, ते खरेदी करण्यासाठी पाकिस्तान सरकारकडे पैसे नसल्याचे देखल बाजवा यांनी सांगिलते. पाकिस्तानकडे असलेली शस्त्रदेखील जुनाट आहे. अनेक रणगाडे हे बंद पडले आहेत, त्यामुळे युद्ध जर झाले तर पाकिस्तान लढू शकत नाही अशी कबुली देखील बाजवा यांनी दिली.

मीर आणि नसीम झहरा यांनी शो दरम्यान सांगितले की, जनरल बाजवा यांनी 2021 मध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी गुप्त चर्चा केल्याचा खुलासा केला होता.

Tags

follow us