Download App

TikTok Star Sana Yousuf : मोठी बातमी! टिकटॉक स्टार सना युसूफची घरात घुसून हत्या

TikTok Star Sana Yousuf : टिकटॉक स्टार सना युसूफची (TikTok Star Sana Yousuf) घरात घुसून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर

TikTok Star Sana Yousuf : टिकटॉक स्टार सना युसूफची (TikTok Star Sana Yousuf) घरात घुसून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) इस्लामाबादमध्ये (Islamabad) सनाची हत्या करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी जी-13 सेक्टरमधील सना युसूफच्या घरात घुसून तिच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या आणि नंतर पळून गेले.

पाकिस्तान पोलिसांना संशय आहे की हल्लेखोर सना युसूफचा ओळखीचा होता आणि तो घरात पाहुणा म्हणून घुसला होता. सना युसूफवर अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही आणि हत्येचे कारणही समोर आलेले नाही.

सना युसूफ कोण होती?

सना युसूफ ही पाकिस्तानी टिकटॉक स्टार होती जिचे लाखो फॅन्स होते आणि तिची लोकप्रियता सतत वाढत होती, परंतु रील बनवून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या मुलीची पाकिस्तानात घरात घुसून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सना युसूफचे दोन फोटो व्हायरल होत आहे. एका फोटोमध्ये ती हसत आहे आणि दुसरा फोटो रक्ताने माखलेले आहे.

नागरिकांनो, EPFO, टॅक्स अन् HDFC बँकेचे 4 मोठे नियम होणार लागू; जाणून घ्या सर्वकाही 

follow us