Trump Putin bombarded by questions in alaska summit Trump shut up but Putin Shouts : सध्या जगामध्ये टॅरिफ वॉर आहे. त्याच दरम्यान अमेरिका आणि भारताचे संबंध पाकिस्तानच्या मुद्द्यावरून ताणले गेलेले आहेत. याच दरम्यान 15 ऑगस्ट म्हणजे शनिवारी सायंकाळी जगातील सर्वात लक्षणीय घटना घडली. कारण अमेरिकेतली अलास्का येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांची भेट झाली. यावेळी त्यांनी एकाच मंचावरून माध्यमांशी संवाद साधला. हे जगातील दोन मोठ्या नेते एकत्र येत असल्याने जगाचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागून होते. त्यात पत्रकारांनी या दोघांवर प्रश्नांचा भडिमार केला असता ट्रम्प गप्प राहिले पण पुतीन जोरात ओरडल्याचं पाहायला मिळालं.
ट्रम्प गप्प पण पुतीन जोरात का ओरडले?
दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. मात्र यामध्ये कोणताही करार झाला नाही. ही बैठक तब्बत तीन तास चालली. त्यानंतर ट्रम्प आणि पुतीन यांनी 12 मिनिटं एकाच मंचावरून माध्यमांशी संवाद साधला. हे जगातील दोन मोठ्या नेते एकत्र येत असल्याने जगाचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागून होते. त्यात पत्रकारांनी या दोघांवर प्रश्नांचा भडिमार केला असता ट्रम्प गप्प राहिले पण पुतीन जोरात ओरडल्याचं पाहायला मिळालं.
The goal is always peace. pic.twitter.com/AvYjUYhh8B
— The White House (@WhiteHouse) August 16, 2025
यावेळी जगभरातील पत्रकारांनी सामान्य नागरिकांच्या मृत्यूंपासून ते सीजफायरपर्यंतचे अनेक प्रश्न विचारले. यावर ट्रम्प यांनी काहीही उत्तरं दिली नाहीत. मात्र जेव्हा एका पत्रकाराने विचारले की, तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना मारणं केव्हा बंद करणार, आणखी एकाने विचारले ट्रम्प त्यांचा शब्द पाळणार का? पण जे व्हायचं ते झालंचं अशा प्रकारे प्रश्नांचा भडिमार होताच पुतीन भडकले आणि जोरात ओरडले, पण ट्रम्प गप्प राहिले. कारण रशियामध्ये माध्यमं त्यांना अशा प्रकारचे प्रश्न विचारत नाहीत. त्यामुळे ट्रम्प यांनी धन्यवाद म्हणत ही पत्रकार परिषद गुंडाळली.
रशियाच्या अटी अन् युक्रेनची भूमिका
युक्रेनने नाटोत सहभागी होण्याची इच्छा सोडून द्यावी असे रशियाने अनेक वेळा म्हटले आहे. युक्रेनने पूर्वेकडील क्षेत्र रशियाला देऊन टाकावे अशीही रशियाची मागणी आहे. खरंतर हा भाग रशियाने आधीच ताब्यात घेतला आहे. युक्रेनने मात्र या मागण्या मान्य करण्यास नकार दिला आहे. कोणत्याही शांतता करारात आम्हाला सुरक्षिततेची हमी मिळावी असे यु्क्रेनने स्पष्ट केले आहे.