Turkey-Syria Earthquake : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या रोज वाढताना दिसत आहे. आंतरराष्ट्र्रीय माध्यमांच्या रिपोर्टनुसार तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात आतापर्यंत १६,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि यामध्ये मृतांची संख्या वाढतच आहे.
तर यामध्ये ५० हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही मोठ्या प्रमाणात लोक अडकले आहेत. दरम्यान, तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, तुर्कीच्या नूरदगी शहरात हा भूकंप जाणवला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.३ मोजली गेली आहे.
भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली जिवंत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यही अत्यंत काळजीपूर्वक सुरू आहे. जे जिवंत आहेत ते ढिगाऱ्यात आपल्या ओळखीच्या लोकांचा शोध घेत आहेत. डेब्रिजचे उत्खनन दिवसरात्र सुरू आहे. लोकही हातानेही साफ करत आहेत. अनेक ठिकाणी बचाव टीमची कमतरता जाणवत आहे. ढिगार्यांच्या आतून जिवंत लोक ओरडत आहेत, पण त्यांच्या मदतीला कोणीच नाही.
भूकंपामुळे हजारो घरांचे नुकसान झाले आहे. यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. पण तुर्कस्तान आणि सीरियातील कडाक्याच्या थंडीनेही लोकांना अडचणीत आणले आहे. लोकांना रस्त्याच्या कडेला निवारा शोधावा लागत आहे.
Under #OperationDost, India is sending search and rescue teams, a field hospital, materials, medicines and equipment to Türkiye and Syria. This is an ongoing operation and we would be posting updates: EAM Dr S Jaishankar
(Pics: EAM's Twitter account) pic.twitter.com/sekkiEoV9P
— ANI (@ANI) February 8, 2023
भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारतातून मदत पाठवली जात आहे. मदत घेऊन चौथे विमान तुर्कीमध्ये दाखल झाले. यामध्ये भारतीय लष्कराचे ५४ सदस्यीय वैद्यकीय पथकही तुर्कीला पोहोचले आहे. याशिवाय खाद्यपदार्थही मोठ्या प्रमाणात पोहोचवण्यात आले आहेत.