Turkiye Election 2023: एर्दोगन पुन्हा एकदा तुर्कियेच्या अध्यक्षपदी

Turkiye Election 2023: तुर्कीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रेसेप तय्यप एर्दोगन यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी आतापर्यंत सलग 11 वेळा निवडणूक जिंकली आहे. दीर्घकाळ सत्तेत असलेल्या रेसेप तय्यप एर्दोगन यांची विरोधी पक्षनेते केमाल केलिकदारोग्लू यांच्याशी कडवी झुंज होती. यापूर्वी 14 मे रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला होता, ज्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला 50% पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत, […]

UPSC Exam (3)

UPSC Exam (3)

Turkiye Election 2023: तुर्कीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रेसेप तय्यप एर्दोगन यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी आतापर्यंत सलग 11 वेळा निवडणूक जिंकली आहे. दीर्घकाळ सत्तेत असलेल्या रेसेप तय्यप एर्दोगन यांची विरोधी पक्षनेते केमाल केलिकदारोग्लू यांच्याशी कडवी झुंज होती. यापूर्वी 14 मे रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला होता, ज्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला 50% पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत, त्यामुळे रन ऑफ फेरी घेण्यात आली. त्यात आता एर्दोगन यांनी बाजी मारली आहे.

Wrestlers Protest : ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, दिल्ली महिला आयोगाने घेतली दखल…

तुर्कीमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एर्दोगन यांना 49.5 टक्के मते मिळाली, तर केमाल केलिकदारोग्लू यांना 43.5 टक्के मते मिळवण्यात यश आले. दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यानही केलिकदारोग्लू यांनी 20 वर्षांपासून सत्तेत असलेल्या रेसेप तय्यिप एर्दोगन यांना जोरदार आव्हान दिले. फेब्रुवारीमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर त्याच्यासाठी हे थोडं कठीण होतं, पण हे सगळं असूनही त्याने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.

Exit mobile version