US Presidential Election Results : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान (US Elections 2024) पार पडल्यानंतर आता मतमोजणीतून निकाल समोर येत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात (Kamala Harris) राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत पहायला मिळत आहे. मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना एकूण २७७ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांना २२६ मते मिळाली आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अजून मतमोजणी सुरू आहे. याच दरम्यान अमेरिकी मिडिया आउटलेट फॉक्स न्यूजने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाच्या विजयाची घोषणा देखील केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांचा सात स्विंग स्टेटसवर सर्वाधिक भर होता. या सर्व राज्यांत आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी २७० मते आवश्यक असतात. कारण येथे एकूण ५३८ इलेक्टोरल कॉलेज आहेत आणि विजयी होण्यासाठी २७० किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्टोरल मतांची गरज असते.
Todya Voting In US: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान; ट्रम्प-हॅरीस यांच्यात अटीतटीची लढाई
सध्याच्या परिस्थितीत अजून ३५ मतांची मोजणी होणे बाकी आहे. या सर्व ठिकाणी ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. जर अशीच स्थिती कायम राहिली तर ट्रम्प यांना एकूण ३१२ मते मिळू शकतात. कमला हॅरिस मात्र २२६ मतांवरच थांबू शकतात. या निवडणुकीच्या निकालांवर जगभरातील देशांची नजर आहे. सध्यच्या परिस्थितीत तर ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार केला असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
दरम्यान, अमेरिकेत ५० राज्ये आहेत. यामध्ये बहुतांश राज्ये प्रत्येक निवडणुकीत एकाच पक्षाला मतदान करत आले आहेत. निवडणुकीत महत्वाचे मानले जाणाऱ्या सात स्विंग स्टेटमधील मतदारांचा कल बदलता असतो. लोकसंख्येच्या आधारावर राज्यांना निर्वाचक मंडळ मते दिली जातात. एकूण ५३८ इलेक्टोरल कॉलेजसाठी मतदान होते. २७० किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्टोरल कॉलेज मते मिळवणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.
डोनाल्ड ट्रम्प : २७७ मते (विजय+ आघाडी: २७७ + ३५ = ३१२)
कमला हॅरिस : २२६ मते