Iran-Israel war : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या इराण-इस्त्राइल (Iran-Israel war ) युद्धाला अखेर पूर्णविराम मिळालायं. पुढील दोन आठवड्यांसाठी दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य केला असून इराणने दिलेला प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्विकारलायं. दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाची घोषणा होताच हा इराणचा मोठा विजय असल्याचं इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी दिलीयं. तर दुसरीकडे इराणचा प्रस्ताव चर्चेसाठी योग्य असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे 40 दिवसांपासून असलेला संघर्ष पुढील दोन आठवड्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यात आल्याचं दिसून येत आहे.
इराण आणि अमेरिकेमध्ये मागील 40 दिवसांपासून विनाशकारी हल्ले सुरु होते. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेकडून इराणचे लष्करी तळ उध्वस्त करण्यात आले. तर इराणमध्ये हवाई हल्लेही सुरुच होते. तर दुसरीकडे इराणकडूनही अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यात येत होते. युद्ध अधिकच पेटल्यानंतर इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जगभरातील देशांचे मालवाहक जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकल्याने अनेक देशांचे अर्थिक चक्र थांबलं होतं. अखेर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी सुरळीत सुरु न केल्यास अमेरिकेकडून काल रात्रीपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला होता.
सारा अली खानने डबिंग स्टुडिओमधील झलक शेअर केली; मुदस्सर अज़ीजसोबतच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा
अखेर पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर अमेरिकेने इराणचा प्रस्ताव स्विकारला असून पुढील दोन आठवड्यांत शांतता करारासाठी दोन्ही देशांनी तयारी दर्शवलीयं. युद्धविरामाची घोषणा होताच इराणच्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरत सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या समर्थनात घोषणाबाजी केलीयं.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण…
दोन्ही देशामध्ये युद्धविरामाची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं दिसून आलंय. युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्याच चित्र होतं. अखेर आखाती देशांच्या शस्त्रसंधीच्या घोषणनेंतर कच्च्या तेलाच्या किमती 20 टक्क्यांनी घसरल्या आहेत.
दरम्यान, शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर आता अमेरिका आणि इराणमध्ये अंतिम चर्चा इस्लामाबादमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे. इराणने दिलेल्या प्रस्तावानुसार अमेरिका इराणच्या अटी, शर्ती मान्य करणार का? या दोन्ही देशांमध्ये पुढील चर्चेत नेमकं काय घडणार? याकडं आता संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलंय.
